अनाधिकृत बांधकामावर होणार निष्कासित ; आमरण उपोषणास यश
पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाच्या व महार वतन हक्क सेवाभावी प्रतिष्ठान च्या वतीने भोसरी येथील महार वतन जमिनीवरील केलेले अतिक्रमण हटवून जमीन मूळ मालकास पुन्हा मिळावी या करिता आमरण उपोषण विभागीय आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी करण्यात आले होते. तीन दिवसांनी आमरण उपोषणाची दखल घेत उपायुक्त महसूल विभागाने व अतिक्रमण विभाग यांनी अखेर मागण्या मान्य करत अतिक्रमण हटविण्यासाठी पत्र तयार करून येत्या १५ दिवसामध्ये कारवाईचे आदेश काढले आहे. या पत्राच्या अनुषंगाने आमरण उपोषण करण्यासाठी मा. उपआयुक्त साहेब यांनी आमरण उपोषणास स्थगिती देण्यासाठी पत्र देऊन आमरण उपोषण सोडण्यात आले आहे. आज पुन्हा एकदा महार वतन हक्क सेवाभावी प्रतिष्ठानला समाजातील अन्याय विरुध्द लढ्यात यश आले आहे.
मी आपल्या सर्व माझ्या बरोबर असणारे माझे सर्व सहकारी व मित्र परिवार यांचे आभार व्यक्त करतो मला सर्वात जास्त आनंद मला झाला आहे की आपल्या सर्वांच्या सहकार्याने हाती घेतलेला महार वतन जमीनी विषयीचा लढा यशस्वी रित्या लढू शकलो आपले सहकार्य माझ्या बरोबर आहे मला येणाऱ्या प्रत्येक अडचणीत आपण माझी साथ दिली माझे मनोबल वाढविले आपली अशीच साथ मला मिळो व आपल्या सर्वांच्या सहकार्या ने महार वतन जमिनी वरील लढा आपण मोठया संघर्षाने पुढे घेऊन जाणार हे मात्र खरे – उपोषणकर्ते शशिकांत दारोळे