अनिल परब, सदानंद कदम, साई रिसॉर्ट, सी कोंच रिसॉर्ट यांची मालमत्ता जप्त करावी – डाॅ.किरीट सोमय्या
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- अनिल परब, सदानंद कदम, साई रिसॉर्ट, सी कोंच रिसॉर्ट दापोली यांनी सीआरझेड नियमाचे भंग करुन बेकायदेशीर बांधकाम केले या साठी शासनाने ₹5.5 कोटीचा दंड ठोठावला आहे, तो अजून पर्यंत भरला नाही यामुळे एमपीसीबी, पर्यावरण मंत्रालय, जिल्हाधिकारीनां त्यांची मालमत्ता जप्त करण्याची विनंती डाॅ.किरीट सोमय्या यांनी केली आहे.
पत्रामध्ये डाॅ.किरीट सोमय्या यांनी कळविले आहे की, रिसॉर्ट एनएक्स, श्री.अनिल परब / श्री. सदानंद कदम व सी कौंच रिसॉर्ट श्री. पुष्कर मुळे यांना भारत सरकार / महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी रु. 2,52,75,000 प्रत्येकी दंड ठोठावला आहे. 28 सप्टेंबर 2022 रोजी या संबंधीचे नोटीस / आदेश आपण त्यांना पाठवले.
हा दंड वसूल करण्यासाठी रत्नागिरी जिल्हाधिकारी किंवा आपण कोणी काहीही प्रयत्न केले नाही ही वास्तविकता आहे. मी पत्र लिहिल्यानंतर 6 डिसेंबर 2022 रोजी आपण या दोन्ही रिसॉर्ट / मालकांना स्मरणपत्र आता पाठवल्याचे मला कळविले आहे.
हा रिसॉर्ट श्री. अनिल परब यांनी बांधला याचे सगळे पुरावे आपल्याकडे आहेत. महाराष्ट्र सरकारने त्या संबंधात जिल्हाधिकारी / जिल्हा कार्यकारी अधिकारी मार्फत दापोली पोलीस स्टेशन येथे 2 एफआयआर नोंदविल्या आहेत.
तरीही जाणूनबुजून आपण श्री. अनिल परब यांना नोटीस पत्र पाठवित नाही याच्या आम्ही गंभीर दखल घेत आहोत.
हा दंड वसूल करण्यासाठी आपण जप्तीची व अन्य कारवाई का केली नाही याचा ताबडतोब खुलासा करावा.
ताबडतोब आपण सी कौंच रिसॉर्ट, साई रिसॉर्ट एनएक्स, श्री. अनिल परब, श्री. सदानंद कदम, श्री. पुष्कर मुळे त्यांच्या बँक खात्यावर जप्ती / टाच आणावी, अशी विनंती करण्यात आली आहे.