क्राइमताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अनुसूचित जातप्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी मोबदल्यात मागितली लाच; महसूल सहाय्यक ACB च्या ताब्यात

माजलगांव दि २५ निर्भीड वर्तमान:- अनुसुचित जमातीचे जात प्रमाणपत्र मिळन्यासाठी उपविभागीय कार्यालय माजलगाव येथे मागितले जातात १ प्रमाणपत्रासाठी २००००/- रुपये उपविभागीय कार्यालय, माजलगाव महसुल सहाय्यकाने लाच मागणी केल्याचा प्रकार उघड झाला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण;

कुटुंबातील ६ व्यक्तींचे राजगौंड जातीचे अनुसुचित जमातीचे जात प्रमाणपत्र मिळणे करीता प्रकरणातील तक्रारदार यांनी सेवासेतु केंद्राद्वारे तहसिल कार्यालय धारुर येथे ऑनलाईन पध्दतीने प्रकरणे दाखल केली होती. तहसिल कार्यालयाची कारवाई होऊन तक्रारदार यांचे सर्व प्रकरणे उपविभागीय कार्यालय माजलगाव येथे दाखल केले. या प्रकरणात यातील आरोपी लोकसेवक श्री. जाधव यांनी उपविभागीय अधिकारी माजलगाव यांचेकडुन सर्व प्रकरणांचे जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी मोबदला म्हणुन प्रत्येक प्रमाणपत्रासाठी २००००/- रुपये प्रमाणे सहा प्रमाणपत्रांचे १२००००/- रुपयांची मागणी करत होते.

तक्रारदार यांना लांच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बीड येथे तक्रार दाखल केली.

मिळालेल्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बीड यांचे अधिकारी यांनी दिनांक २४/०१/२०२४ रोजी लाच मागणी पडताळणी केली असता लोकसेवक श्री. जाधव यांनी पंचासमक्ष ५००००/- रुपये लाचेची मागणी करुन तडजोअंती ४००००/- रुपये स्विकारण्याचे मान्य केले होते. तर नंतर सापळा लावला असता आरोपी जाधव यांनी तडजोडीअंती मान्य केलेली रक्कम ४००००/- पैकी ३००००/- रुपये पंचासमक्ष खाजगी व्यक्ति आरोपी शेख असेफ यांनी लोकसेवक वैभव जाधव यांच्या सांगनेवरुन लाच रक्कम ३००००/- लागलीच स्विकारतांना त्याला रंगेहात पकडण्यात आले आहे.

त्यानुसार श्री. वैभव बाबुराव जाधव वय ४४ वर्ष महसुल सहायक नेमणुक उपविभागीय कार्यालय, माजलगाव वर्ग-३ व २) श्री. शेख आसेफ अहमद वय 24 वर्ष यांना पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडुन ३००००/-रुपये लाचेची मागणी करुन लाच रक्कम स्विकारल्या वरुन या दोघान विरुध्द पोलीस ठाणे माजलगाव शहर जिल्हा बीड येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, लाप्रवि छत्रपती संभाजी नगर, श्री. राजीव तळेकर, प्रभारी अपर पोलीस प्रवि छत्रपती संभाजी नगर, यांचे मार्गदर्शनाखाली, श्री. शंकर शिदि, पोलीस उप अधीक्षक, बीड व पोलीस अंमलदार यांनी कारवाई केली आहे.

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!