क्राइमताज्या घडामोडीपुणे

अपहरण करून मुलाला पळवुन नेणाऱ्या आरोपींच्या उत्तमनगर पोलीसांनी आवळल्या मुसक्या..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- उत्तमनगर पोलीस स्टेशन येथे तक्रारदार पवार यांनी त्यांचा जुळा भाऊ दिलीप गोरख पवार, वय २३ वर्ष यास दि. २२/०६/२०२३ रोजी ठाकुर गॅरेज समोर, कोंढवे धावडे, पुणे येथून एक महिला व इतर ०२ अनोळखी व्यक्तींने एका पांढ-या रंगाच्या चारचाकी गाडीतुन पळवुन नेले बाबत तक्रार दाखल केली होती.

गुन्ह्याचे गांर्भिय लक्षात घेता पोलीसांनी अपहरण करुन पळुन नेणा-या महिला आरोपी चा शोध घेत असताना तांत्रिक माहितीच्या आधारे ते हॉटेल यात्री, वापी रेल्वे स्टेशन जवळ, चापी वडसाल, गुजरात येथे असलेची माहिती मिळवली व वरिष्ठांच्या आदेशाने गुजरात येथे सपोनि दादाराजे पवार पो.ना हजारे, पो. शि. हुवाळे, पो. शि. पाडाळे, हे तपास कामी रवाना झाले. त्यांनी शिताफिने छापा टाकुन हॉटेल यात्री निवास, वापी, गुजरात येथुन अपहरण केलेला मुलगा दिलीप पवार व महिला आरोपी यांना ताब्यात घेतले व दाखल असलेल्या गुन्हयातील अपहृत मुलगा दिलीप गोरख पवार, याची गुन्हा दाखल झाल्यापासुन २४ तासाच्या आत सुटका केली. महिला आरोपी हिला उत्तमनगर पोलीस स्टेशन येथे आणुन तिच्याकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता तिला मदत करणारे साथीदार प्रथमेश राजेंन्द्र यादव, वय २१ व अक्षय मारुती कोळी, वय २६  हे असल्याचे निष्पन्न झाले होते. तात्काळ या साथिदारांना पुसेगाव येथे तपास पथकाने जावुन शिताफिने ताब्यात घेवुन अटक केली आहे.

गुन्हयातील आरोपीयांना मा. न्यायालयाने दिनांक २८/०६/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजुर केली असून त्यांच्याकडे पुढील तपास सपोनि दादाराजे पवार हे करीत आहेत.

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!