ताज्या घडामोडी

अल्पवयीन मुलीकडून देह विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या आरोपींना केले जेरबंद..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा: – मालवणी पोलीस ठाणेच्या हद्दीत दोन व्यक्ती स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता वेश्यागमनाकरीता मुली व स्त्रिया पुरवून कुंटणखाना चालवत असल्याची विश्वसनीय माहिती कक्ष- १० गु.प्र.शा., गु. अ. वि. मुंबई येथील सपोनि. धनराज चौधरी यांना मिळाली. मिळालेली माहिती सपोनि. धनराज चौधरी, यांनी वरिष्ठांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबध्द छापा कारवाईची योजना आखली.

दिनांक ०१/०२/२०२३ रोजी कक्ष- १० गुप्रशा येथील पोलीस पथकाने मालवणी पोलीस ठाणे, मुंबई च्या हद्दीतील रूम नं. ४, १ ला मजला, खानदेश चाळ, ब्लॉक नं. ३, खारोडी पोस्ट ऑफीसच्या पाठीमागे, मालवणी मालाड पश्चिम, मुंबई ९५, येथे बोगस गिन्हाईक पाठविले आणि दोन पंचांसह छापा टाकला असता तेथे दोन व्यक्ती आणि एक अल्पवयीन मुलगी मिळून आली. अधिक चौकशीत आढळून आले की, हे दोघे गिन्हाईकांना वेश्यागमनासाठी आकर्षित करीत असतात व त्याकरीता गरजू अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायाकरीता प्रवृत्त करून देह विक्री करण्याकरीता सुरीया, हाबरा, नॉर्थ २४ परगना, पश्चिम बंगाल येथुन आणुन पुरवित असल्याचे निदर्शनास आले. सदरठिकाणी दिसत्या परिस्थितीचा पंचनामा करून देह विक्री करण्याकरीता प्रवृत्त करणारे आरोपी चंदन लालतू शेख, वय २९ वर्षे, धंदा वेश्या दलाल, व अबिर साफियर मिध्ये, वय १८ वर्षे तसेच १५ वर्षे ०६ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या दोन इसमांकडून मोबाईल फोन आणि रोख रु. ३०००/- तपासकामी हस्तगत करून आरोपीच्या विरोधात मालवणी पोलीस ठाणे येथे दि. ०२/०२/२०२३ रोजी मालवणी पोलीस ठाणे, मुंबई. गु.र.क्र. १५१ / २०२३ कलम ३६६ (अ), ३७० (अ) (३), ३७२, ३७६, ३४ भादंविसं. सह ४, ५ स्त्रीया व मुलींचा अनैतिक व्यापार प्रति अधिनियम १९५६ सह पोस्को कलम ४, ८, १२, १७, १८. प्रमाणे गुन्हा नोंद करून आरोपीतांना अटक केले आहे व अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतलेल्या मुद्देमालासह पुढील कायदेशिर कारवाईकरीता मालवणी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिलेले आहे.

सदरची यशस्वी कारवाई मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री. लखमी गौतम, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. ज्ञानेश्वर चव्हाण, मा. पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण- १), श्री. कृष्ण कान्त उपाध्याय, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (डि-पश्चिम) श्री. दिपक निकम यांचे मार्गदर्शनाखाली, कक्ष- १० गुप्रशा, मरोळ मुंबई येथील प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. दिपक सावंत, पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे, सहाय्यक पोलीस निरिक्षक श्री धनराज चौधरी, सहाय्यक पोलीस निरिक्षक श्री. गणेश तोडकर, पोलीस अंमलदार पो.ह. जगदीश धारगळकर, पो.ह तातोबा खरात, पोशि स्वप्निल खेडेकर, मपोशि दया खाडे, पोशि प्रकाश चव्हाण यांनी पार पाडली आहे.

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!