अवैध हुक्का बार नाईट रायडर हॉटेलवर सामाजिक सुरक्षा विभागाची धडक कारवाई…!!
सिंहगड कॅम्पस, कर्वेनगर व वनदेवी मंदिर जवळील हुक्काबार कारवाई कधी होणार..? - नागरिकांचा सवाल
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- मुंढवा हद्दीत धायरकर वस्ती येथील नाईट रायडर हॉटेलमध्ये अवैध हुक्का बार चालु असल्याची गोपनिय माहिती बातमीदारा मार्फत सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा यांना मिळाली.
सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवुन हॉटेलवर छापा टाकला असता बेकायदेशीरपणे अवैध हुक्का बार सुरू असल्याचे आढळून आले. नाईट रायडर हॉटेल मध्ये हुक्कापॉट ठेवुन तंबाखुजन्य हुक्का धुम्रपान करताना आढळुन आले. घटनास्थळावरून २५,३००/- रू. कि. चा मुद्देमाल त्या मध्ये वेगवेगळया कंपनीचे तंबाखुजन्य हुक्कयाचे प्लेवर व हुक्कयाचे साहित्य असा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणी चार इसमाविरूध्द मुंढवा पोलीस स्टेशन येथे गुरनं ५५/२०२३ सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम-२०१८ चे कलम ४ अ, २१-अ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन त्यांना पुढील कारवाई करीता मुंढवा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सामाजिक सुरक्षा विभाग पुन्हा मोठ्या ताकतीने अवैध्य धंदे करणार्यावर व तरूणाईला वा मार्गावर नेणाऱ्याचा चोख समाचार घेतांना दिसत आहे त्यामुळेच अपेक्षे सहित भारती विद्यापीठ हद्दीतील सिंहगड कॅम्पस भागातील व वारजे माळवाडी हद्दीतील बारच्या नावाखाली वरच्या मजल्यावर सुरू असलेली कर्वेनगर, वनदेवी मंदिर जवळील हुक्काबार यांच्यावर सामाजिक सुरक्षा पथक कधी कारवाई करणार आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये होतांना दिसत आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्री. अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री भरत जाधव यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सपोनि अश्विनी पाटील पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, तुषार भिवरकर, इरफान पठाण, इम्रान नदाफ, अमित जमदाडे या पथकाने यशस्वी केली आहे.