ताज्या घडामोडीपुणेसामाजिक

आळंदी शहरामध्ये होणाऱ्या ‘गीता भक्ती अमृत महोत्सव’ कार्यक्रमासाठी वाहतुकीत मोठे बदल

पुणे, निर्भीड वर्तमान:- आळंदी शहरामध्ये होणाऱ्या ‘गीता भक्ती अमृत महोत्सव’ कार्यक्रमा करीता मोठ्या संखेने भाविक व बरेचशे  व्ही.आय.पी भेट देणार असून, दररोज ३० ते ३५ हजार भाविक ये-जा करणार आहेत.  या दिघी आळंदी वाहतूक विभाग हद्दीतील मार्गावर व पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुक सुरक्षित व सुरळीतपणे राहण्या करीत भावीक व नागरिकांची गेरसोय होऊ नये या साठी तात्पुरते स्वरुपात वाहतुक बदल करण्यात येणार आहेत.

'गीता भक्ती अमृत महोत्सव’
‘गीता भक्ती अमृत महोत्सव’

काय होणार बदल:

दिघी आळंदी/चाकण वाहतुक विभाग अंतर्गत

 • इंद्रायणी घाट ते चाकण चौक जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांकरीता बंद राहील,

➤ पर्यायी मार्ग- इंद्रायणी नगर कमान काटे पाटील चौक नवीन पुल मार्गे इच्छित स्थळी जातील.

 • इंद्रायणी नगर कमान ते काटेपाटील चीक एकेरी वाहतूक सुरु राहील
 • काटे पाटील चौक ते इंद्रायणी घाट मेन रोड सर्व वाहनांना प्रवेश बंद

➤ पर्यायी मार्ग काटे पाटील चौक नवीन पुल मागे इच्छित स्थळी जातील.

 • पुंढरे पाटील चौक ते बापदेव चौक सर्व वाहनांना बंदी राहील

> पर्याची मार्ग- १. इंद्रायणी हॉस्पीटल मार्गे  २. गोपाळपुरा मार्ग  ३. चाकण चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

 • चिवळी फाटा चौक, चाकण येथुन आळंदी कडे येणारे सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांसाठी बंदी राहील
 • ➤ पर्यायी मार्ग -१. भारतमाता चौक हवालदार वस्ती देहूफाटा चौक चहोली फाटा चौक मार्गे इच्छित स्थळी जातील  २. जयगणेश साम्राज्य चौक खडी मशीन रोड अलंकापुरम चौक मार्गे इच्छित स्थळी जातील
 • आळंदी फाटा चौक, चाकण येधुन आळंदीकडे येणारे सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांसाठी बंदी राहील,
 • ➤ पर्यायी मार्ग १. भारतमाता चौक हवालदार वस्ती देहुफाटा चौक चहोली फाटा चौक मार्ग इच्छित स्थळी जातील  २. जयगणेश साम्राज्य चौक खडी मशीन रोड अलंकापुरम चौक मार्गे इच्छित स्थळी जातील
 • माझगाव फाटा चौक, येथुन आळंदीकडे येणारे सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांसाठी बंदी राहील.

➤ पर्यायी मार्ग १. भारतमाता चौक मार्गे इच्छित स्थळी जातील,

 • देहूफाटा चीक कडुन आळंदीकडे येणारे सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांसाठी बंदी राहील.

➤ पर्यायी मार्ग – १. हवलदार वस्ती मागे इच्छित स्थळी जातील   २ चहोली फाटा मागे इच्छित स्थळी जातील

 • चाकण शिक्रापुर रोड, रसिका हॉटेल येथुन आळंदीकडे येणारे सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांसाठी बंदी राहील.

➤ पर्यायी मार्ग –

१. शिक्रापुर रोड मार्गे इच्छित स्थळी जातील

२. चाकण मोशी मार्गे इच्छित स्थळी जातील

3. कोयाळी मरकळ मार्गे इच्छित स्थळी जातील

 • आळंदी शहरामधे कार्यक्रमाचे अनुषंगाने चाकण चौक ते इंद्रायणी हॉस्पीटल पर्यंत तात्पुरते स्वरुपात वाहने पार्किंग थांबविण्यास मनाई करण्यात येत आहे.

पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे हद्दीत वर दिल्याप्रमाणे दि.०४/०२/२०२४ सकाळी ००,०० ते दि.११/०२/२०१४ रोजी २४.०० वा पर्यंत तात्पुरते स्वरुपात वाहतूक बदल (अत्यावश्यक सेवेतील वाहने उदा. पोलीस, अॅम्ब्युलन्स, फायरब्रिगेड, पेट्रोल, डिझेल टैंकर, पीएमपीएमएल बसेस, स्कुल बस, वगळून) आवश्यकते नुसार करण्यात येणार असुन वाहतूक बदलाची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे तरी नागरीकांनी दिलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेले आहे.

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!