इंन्स्टाग्रामवरुन ओळख करून केला बलात्कार: स्वारगेट पोलीसांनी उस्मानाबाद येथे जावुन आरोपीस ठोकल्या बेड्या..!!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- इंन्स्टाग्रामवरुन ओळख निर्माण करुन, भेटण्यास बोलावुन जबरदस्तीने बलात्कार करुन, अश्लिल फोटो व्हायरल करणा-या आरोपीस उस्मानाबाद येथुन स्वारगेट पोलीस स्टेशनकडुन अटक करण्यात आली आहे.
यातील पिडीत मुलीला इंन्स्टाग्राम यावरुन फ्रेंड रिक्वेस्ट व मेसेजेस पाठवुन आरोपी याने ओळख निर्माण केली. ओळख झाल्याने तिला गोड बोलुन भेटण्यासाठी बोलावुन जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापीत केले व पिडीत मुलीला न कळता तीचे अश्लिल फोटो काढुन फोटो इंन्स्टाग्राम अकाऊंटवरती व पिडीत मुलीचे काका यांचे वॉट्सअपवरती पाठवुन पिडीत मुलीची बदनामी केल्याने, पिडीत मुलीने तक्रार दिल्याने स्वारगेट पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दाखल गुन्हयातील आरोपी संजय ऊर्फ ज्ञानेश्वर बाळु सितापे हा मिळुन येत नव्हता. तो पोलीसांना गुंगारा देत होता. परंतु पोलीसांनी सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक विश्लेषन करुन स्वारगेट पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार फिरोज शेख व शिवा गायकवाड यांनी त्यास सुरडी, ता. जिल्हा उस्मानाबाद येथुन जेरबंद केले आहे. त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास करता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यास अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाप्रमाणे श्री. अशोक इंदलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्वारगेट पोलीस ठाणे पुणे शहर, श्री. सोमनाथ जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे), स्वारगेट पोलीस ठाणे पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत संदे, अश्विानी बावचे, पोलीस उप-निरी. श्री. येवले व तपासपथकातील अंमलदार तारु, फिरोज शेख, भरगुडे, गायकवाड, चव्हाण, गोडसे, खेदाड, अनिस शेख, महामुलकर यांनी त्याचा शोध घेवुन त्यास अटक केलेली आहे.