उपविभागीय अधिकारी यांच्या नावाने मागितली लाच आरोपी चालक ला.प्र. विभागाच्या ताब्यात..!!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- तक्रारदार यांनी मौजे. शिरसाठे ता. इगतपुरी येथील जमीन खरेदी करीता श्री. गांगुर्डे यांचे कडून विसार पावती देवून केलेल्या नोटरीवर तत्कालीन उपविभागीय अधिकारी, इगतपुरी त्रंबकेश्वर जि. नाशिक येथे दाखल दाव्याचा निकाल श्री. गांगुर्डे यांचे लाभात म्हणजेच तक्रारदार यांचे बाजूने लावून दिल्याचे मोबदल्यात उपविभागीय अधिकारी श्री.चव्हाण यांना देण्यासाठी व स्वतःसाठी २,००,०००/- रू. लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक कार्यालयात तक्रार दिली होती.
दिलेल्या तक्रारीवरून ला.प्र.वि. नाशिक पथकाने पडताळणी करून सापळा आयोजित केला असता सापळा कारवाई दरम्यान आरोपी अनिल बाबुराव आगीवले वाहन चालक, तहसिल कार्यालय, त्रंबकेश्वर, जि. नाशिक संलग्न उपविभागीय अधिकारी, इगतपुरी- त्रंबकेश्वर जि. नाशिक यांनी तक्रारदार यांचे कडे २,००,०००/- रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी १,५०,०००/- रूपये लाचेची रक्कम अनंत कान्हेरे मैदान व शासकीय विश्रामगृह यांचे मध्ये असलेल्या रोडवर लाच स्विकारतांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचेविरुध्द मुंबई नाका पोलीस ठाणे, नाशिक शहर येथे गुर ७५/२०२३, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७.७ अ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
लाचलुचपत विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात आले की, भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र, नाशिक येथे संपर्क करावा.