क्राइमताज्या घडामोडीपुणे

एक वर्षापासुन फरारी असलेल्या आरोपीस सहकारनगर पोलीसांकडून अटक..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- मागिल वर्षापूर्वी दि. १७/०३/२०२२ रोजी लोखंडी कोयत्याने मारहाण करून जखमी केल्याबाबत सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. गु.र.नं. ५९ / २०२२ भादवी कलम ३२६,३२४,३२३, ३४ आर्म अॅक्ट ४ (२५) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद आहे.

दाखल गुन्हयाचा तपास करून यातील आरोपी अमीत संजय मोरे वय २६ वर्षे, रोहन राजु आरडे वय २० वर्षे व एक विधी संघर्ष बालक यांना अटक करून त्यांचे विरूध्द यापुर्वी मा. न्यायालयात दोषारोपपत्र सादर केलेले आहे.

या दाखल गुन्हयामधील आरोपी आदित्य पद्माकर डाकले ऊर्फ शेंडया वय २० वर्षे हा गुन्हा घडल्यापासुन पळुन जावुन लपुन बसलेला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहकारनगर पोलीस स्टेशन श्री. सावळाराम साळगांवकर यांनी आरोपींचा शोध घेवुन अटक करणे बाबतचे आदेश व सुचना तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक समीर शेंडे व तपास पथकाचे स्टाफने तपास सुरु केलेला असतांना पाहीजे आरोपींचा बातमीचे आधारे शोध घेत असताना पोलीस अंमलदार महेश मंडलीक व विशाल वाघ यांना बातमी मिळाली की, एक वर्षापासुन फरारी असलेला आदित्य डाकले शेंडया हा त्याचे राहते घरी आला आहे. लागलीच त्याचे घरी जावुन पोलिसांनी आदित्य पद्माकर डाकले ऊर्फ शेंडया वय २० वर्षे यास दाखल गुन्ह्यात अटक केली आहे. आरोपी हा सहकारनगर पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन तो गुन्हा घडल्यापासुन पळुन जावुन सोलापुर, उस्मानाबाद या भागात लपुन छपुन राहत होता.

सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग श्री. प्रविणकुमार पाटील पोलीस उपायुक्त, परिमंडळ – २, श्रीमती स्मार्तना पाटील मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग नारायण शिरगावकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सावळाराम साळगांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. मनोज शेडगे यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक समीर शेंडे, पोलीस अंमलदार बापु खुटवड, भुजंग इंगळे, सुशांत फरांदे, बजरंग पवार, महेश मंडलिक, नवनाथ शिंदे, सागर सुतकर, सागर कुंभार, विशाल वाघ, खंडु शिंदे यांनी केली आहे.

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!