ताज्या घडामोडीपुणेसामाजिक

कर्वेनगर – वारजे क्षेत्रिय कार्यालयच्या आकाशाचिन्ह विभागाचा भोंगळ कारभार

पुणे, निर्भीड वर्तमान:- वारजे माळवाडी हद्दीमध्ये सर्व लाईटचे खांब, रस्त्याच्या कडेला तर झाडावरती अनाधिक्रूतपणे जाहिरातीचे फलक / होल्डिंग लावल्या जात आहे. तरी कर्वेनगर – वारजे क्षेत्रिय कार्यालयातिल आकाशाचिन्ह विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांच्या स्पष्टपणे निदर्शनात येत आहे. रिपब्लिकन संघर्ष सेनेने सदरच्या अनधिकृत फलक तात्काळ हटवून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनमार्फत सहाय्यक आयुक्त यांना केली आहे.

 

वारजे माळवाडी-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यक्षेत्रातील आकाशचिन्ह विभागाचे अधिकारी कर्मचारी व्यावसायिक जाहिरातीचे बॅनर, फ्लेक्सकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र वारजे मध्ये बघायला मिळत आहे.

वारजे क्षेत्रीय कार्यालयाच्या आकाशाचिन्ह विभागाचा भोंगळ कारभार
वारजे क्षेत्रीय कार्यालयाच्या आकाशाचिन्ह विभागाचा भोंगळ कारभार

पुणे महानगरपालिकेचे सर्व नियम धाब्यावर बसवून सर्रास बांधकाम व्यावसायिक, हॉटेल चालक इतर व्यावसाईक महानगरपालिकेच्या जागेवर रस्त्याच्या बाजुला वाहतुकीला अडथळा व शहर विद्रूपीकरण करत आहेत तरी आकाशचिन्ह विभागाचे अधिकारी सरकारी वाहनात फिरून व्यावसायिक जाहिरात लावलेले फलक नजरेआड करतात. यासंदर्भात रिपब्लिकन संघर्ष सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मंगेशभाऊ सोनवणे  यांनी लेखी निवेदन देऊन तात्काळ सर्व फलक काढावे व दोषींवर गुन्हे दाखल करावी अशी मागणी केली आहे.

कर्वेनगर - वारजे क्षेत्रिय कार्यालय
कर्वेनगर – वारजे क्षेत्रिय कार्यालय

व्यावसाईक हे आकाश चिन्ह विभागाच्या लोकांबरोबर आपले हितसंबंध जपत महानगरपालिकेचा नियमाला धाब्यावर बसून सर्रासपणे जाहिरातफलक, होर्डिंग लावतात. क्षेत्रीय कार्यालयाचे कर्मचारी काही फलक हटविण्याचे काम करत असताना विशिष्ट फलकांनवर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही जाणीवपूर्वक नजर आड करतात असा थेट आरोप निवेदना मार्फत केला आहे.निवेदना  सोबत पुरव्यास्वरूप काही फोटोही सादर करण्यात आले आहेत.

कर्वेनगर - वारजे क्षेत्रिय कार्यालय
कर्वेनगर – वारजे क्षेत्रिय कार्यालय

आतातरी पुणे महानगरपालिका कर्वेनगर – वारजे क्षेत्रिय कार्यालयाचे वरिष्ट अधिकारी कश्या प्रकारे दखल घेऊन अनधिकृत जाहिरतीचे फलक लावणारे व त्यांना जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणारे अधिकारी यांच्यावर काय कारवाई करतात ही बघणे महत्वाचे असणार आहे.

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!