कसबा पेठ विधानसभा पोट निवडणूक मतमोजणी असल्याने, कोरेगाव पार्क पुणे परिसरातील वाहतूक बदल..!!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- दि.०२/०३/२०२३ रोजी, कसबा पेठ विधानसभा पोट निवडणूक मतमोजणी ही साऊथ मेन रोडवरील धान्य गोडावून, कोरेगाव पार्क, पुणे येथे असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होणार आहे, त्यामुळे नागरिकांची तसेच वाहनचालकांची गैरसोय होऊ नये तसेच निवडणूक मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इ.) खेरीज करुन या परिसरातील वाहतूक दिनांक- ०१/०३/२०२३ रोजी सकाळी ११/००वा ते दिनांक ०२/०३/२०२३ रोजी मतमोजणी प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत आवश्यकतेनुसार तात्पुरती खालीलप्रमाणे वाहतुकीस बंद रस्ते व वाहतुक वळविण्यात येत आहे तसेच नो व्हेईकल झोन आदेश देण्यात आला आहे.
१) सेंट मिरा कॉलेज व अतुर पार्क सोसायटीकडुन साऊथ मेन रोडकडे येणा-या वाहनांना लेन नं.१ पर्यंत प्रवेश देण्यात येईल. लेन नं. १ येथे डावीकडे वळुन इच्छीत स्थळी जावे. याठिकाणी बॅरिकेटींग करण्यात येणार आहे.
२) साऊथ मेन रोड लेन नं. ५, ६ व ७ कडुन साऊथ मेन रोडवर येणा-या वाहनांना लेन नं. ४ पर्यंतच प्रवेश देण्यात येईल. लेन नं. ४ येथे उजवीकडे वळुन इच्छीत स्थळी जावे लागेल.
३) आवश्यकते प्रमाणे सेंट मिरा कॉलेज समोर, कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन समोर व साऊथ मेन रोड लेन नं. ५ येथे बॅरिकेटींग करण्यात येणार आहे.
४) साऊथ मेन रोड लेन नं. २ येथे प्लॉट नं. ३८ – जैन प्रॉपर्टी समोर बॅरिकेटींग करून सर्व प्रकारच्या वाहनांना साऊथ मेन रोडकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात आला आहे.
५) साऊथ मेन रोड लेन नं. ३ येथे बंगला नं. ६७ व ६८ या दरम्यान बॅरिकेटींग करून सर्व प्रकारच्या वाहनांना साऊथ मेन रोडकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
६) दरोडे पथ (कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन) ते लेन नं. ५ साऊथ मेन रोडवर रस्त्याच्या दोन्ही बाजुस दिनाक ०१/०३/२०२३ रोजी सकाळी ११/०० वा ते दि.०२/०३/२०२३ रोजी मतमोजणी प्रक्रीया पुर्ण होई पर्यंत नो व्हेईकल झोन करण्यात आला आहे.
वाहनपार्कींग ठिकाणे
१. मतमोजणी प्रक्रियेशी सबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी यांना दुचाकी वाहनांचे पार्कींग संत गाडगे महाराज शाळेच्या आवारात करावी.
२. मतमोजणी करता येणारे उमेदवार, त्यांचे प्रतीनिधी व इतर नागरिक यांच्या सर्व प्रकारच्या वाहनांना संत गाडगे महाराज शाळेच्या आवारात पार्कींग करावे.
तरी वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून होणारी गैरसोय टाळावी व पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.