कामगार,शेतकरी यांच्या न्याय हक्कांसाठीचा लढा चालुच ठेवणार – हरेशभाई देखणे
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- कामगार शेतकरी,रिपब्लिकन चळवळीचे नेते मा.हरेशभाई देखणे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त केंद्र शासन व राज्य शासनाच्या योजनांची माहिती आणि, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला. प्रारंभी यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक रिपब्लिकन नेते मा. विनोदजी निकाळजे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मा.हरेशभाई देखणे यांचा, शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी शिरोली व परिसरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील असंख्य दिग्गज मान्यवरांकडून मा.हरेशभाई देखणे यांचा सामुहिक सत्कार करण्यात आला. या अभिष्टचिंतन सोहळ्याला रिपब्लिकन नेते विनोद निकाळजे, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे,शिव व्याख्याते संपत गारगोटे,कामगार नेते रज्जाकभाई शेख,रिपब्लिकन कष्टकरी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तुषार जगताप गोंदिया जिल्हा संपर्कप्रमुख प्रमोद खोब्रागडे,जिल्हध्यक्ष तुषार गायकवाड,कार्याध्यक्ष दिलिप पालवे, RPI कामगार आघाडीचे कार्याध्यक्ष अनिलभाऊ मोरे,मनविसे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश सावंत,RPI (A) पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कैलास केदारी,भाजपा तालुका सरचिटणीस संदिप दजगुडे, उद्योजक कुमार गोरे,पत्रकार प्रभाकर जाधव,API कारंडे साहेब,खेड पोलिस स्टेशनचे हवालदार अवगडे साहेब,गिलबिले साहेब,शिरोली गावचे उद्योजक जगनदाजी सावंत,उद्मोजक मनोज सावंत,राष्ट्रवादी काँग्रस चे नेते संजय सावंत,शिरोली ग्रामपंचायत सदस्य संजय एकनाथ सावंत,ग्रामपंचायत सदस्य कैलास केदारी,व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अविनाश दुधवडे,खेड ता.कार्याध्यक्ष सत्यवान शिंदे,नवतरुण मित्र मंडळाचे उपाध्यक्ष बबन सावंत,युवानेते राहुल सावंत इ.विविध क्षेत्रातील पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
सचिन गोपनारायण, वाल्मीक पाटील, पांडुरंग पुजारी, यांच्यासह, संघटनेचे सर्व पदाधिकारी व शिरोली नगरीतील असंख्य मान्यवर महिला भगिनी यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या वेळी कार्यक्रमावेळी पुणे जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे शिव्याख्याते संपत गारगोटे,कामगार नेते रज्जाकभाई शेख,मनसे विद्यार्थी सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मा मंगेश सावंत,शेतकरी नेते विश्वास कदम,किसनराव गोपाळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणातून, मा. हरेशभाई देखणे यांच्या उल्लेखनीय समाजकार्याचा गुणगौरव केला.तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सम्नान करण्यात आला.