कामगारांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालसमोर केले तीव्र धरणे आंदोलन
मागण्या मान्य न झाल्यास विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा रिपब्लिकन कष्टकरी संघटनेचा इशारा
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- ट्रेंड इंडिया टेक्नोलॉजीस कंपनी प्रा. लि. वासुली फाटा, चाकण येथील खोटे आरोप लावुन बडतर्फ केलेल्या कामगारांना कामावर त्वरित रूजु करून घ्यावे तसेच कामगारांना न्याय न देऊ शकणारे, प्रशासनाने अधिकार काढुन घेतल्याने कामगार आयुक्त कार्यालयाला कोणतेही अधिकार नसल्याचे कामगार अधिकारी कामगारांना सातत्याने सांगत असल्याने कामगार आयुक्त कार्यालय, पुणे हे बंद करावे ही प्रमुख मागणी घेऊन दि.१२ सप्टे २०२३ रोजी रिपब्लिकन कष्टकरी शेतकरी संघटनेने कामगार व शेतकरी वर्गाच्या विविध मागण्यांसाठीच जिल्हाधिकारी कार्यालय,पुणे येथे जाहिर धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच मागणी मान्य न झाल्या पुढील आंदोलन विभागीय आयुक्त पुणे यांच्या कार्यालयासमोर करणार असल्याचा इशारा रिपब्लिकन कष्टकरी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हरेशभाई देखणे यांनी दिला आहे .
कामगारांना न्याय न देऊ शकत असल्या कारणाने तसेच कामगारांबाबत कोणतेही अधिकार कामगार आयुक्तांना नसल्याने कंपन्यांच्या बाजुने भुमिका घेणारे कामगार आयुक्त कार्यालय पुणे कायमस्वरूपी बंद करण्यात यावे. ट्रेंड टेक्नॉलॉजिज इंडीया प्रा. लि. चाकण कंपनीतील कामगारांवर खोटे आरोप लावुन बडतर्फ केलेल्या कामगारांना कामावर घेण्यात यावे तसेच मा. सरकारी कामगार अधिकारी साो. सौ. स. रा. धोत्रे मॅडम यांच्या कामगारांच्या बाबत उदासिनते बाबत व कामगारांशी अरेरावीची भाषा करून अर्वाच्य भाषेत कामगारांना हिन वागणुक देवुन कामगारांवर सातत्याने दबाव टाकणा-या अधिकारी सौ. स. रा. धोत्रे यांचेवर निलंबनाची कारवाई करावी. यांनी कामगारांचे मानसिक, शारिरीक व आर्थिक छळ केल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे व तसेच २००६ ची दप्तर दिरंगाई कायद्याची अमंल बजावणी कराण्यात यावी.पुणे जिल्हयातील साईडपट्टीसह खड्डे मुक्त रस्त्याचे काम करण्यात यावे.खेड तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यात यावेत.सर्वसामान्यांना, शेतकर्यांना अवास्तव वाढीव विजबिल देऊन त्यांचे मानसिक शारीरिक,आर्थिक शोषण करणार्या अधिकार्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी. खेड तालुक्यातील वाहतुक कोंडीचा बिकट प्रश्न सोडवावा. असे विविध मागण्यांचे निवेदन मा.ज्योती कदम (निवासी जिल्हाधिकारी,पुणे) यांना देण्यात आले .
या आंदोलनाचे नेतृत्त्व रिपब्लिकन कष्टकरी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हरेशभाई देखणे यांनी केले.यावेळी प्रदेश सचिव संदिप साळुंखे,गोंदिया जिल्हा संपर्कप्रमुख प्रमोद खोब्रागडे,पुणे जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड,कामगार नेते रज्जाकभाई शेख,सामाजिक कार्यकर्ते सुरज गायकवाड,मोबिनभाई शेख,चेतन सोनवणे,सत्यवान शिंदे इ. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनावेळी वंचित बहुजन आघाडी,शिवसेना (उध्वव गट),राष्ट्रवादी काँग्रेस कामगार आघाडी,रिपब्लिकन सेना, पँथर युवा सेना इ.पक्ष संघटनांनी आंदोलनाला पाठींबा दिला.