पुणे

कारागृहातील बंदीजणांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री सुरू..!!

प्रदर्शन व विक्री दि 11/01/2023 ते दि. 26/01/2023 याकालावधीत उद्योग विक्री केंद्र, येरवडा मध्यवर्ती कारागृह, येरवडा पुणे येथे सुरु राहणार आहे.

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- मकर संक्रांती सणानिमित्त कारागृहातील बंदीजनांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री उदघाटन समारंभ नुकताच मा. श्री. अमिताभ गुप्ता (भा.पो.से.) अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी कारागृह उपमहानिरीक्षक पश्चिम विभाग श्रीमती स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक मुख्यालय- श्री. सुनील ढमाळ येरवडा मध्यवर्ती कारागृह अधीक्षक श्री. शिवशंकर पाटील व सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण – श्रीमती – एम.डी. कश्यप इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

मा.श्री. अमिताभ गुप्ता म्हणाले की, कारागृहातील बंदीजनांमध्ये अनेक सुप्त कलागुण असतात, बंद्यांना त्यांचे कलागुण /छंद कारागृहात असताना जोपासण्यासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून दिल्यास त्यांच्याकडून विविध कल्पक गोष्टींची निर्मिती होत असते. बंदी कामात गुंतले गेल्याने ते कारागृहातील कालावधीत सतत व्यस्त राहतात. कारागृह उत्पादित वस्तूंना शासनाच्या विविध विभागाकडून मोठ्या प्रमाणात मागणी असते. उदा: टेबल, खूर्ची, कपाटे, गणवेश, सतरंजी, साड्या फाईल्स ईत्यादी परंतू बंदीजणांनी तयार केलेल्या नवनवीन कल्पक व दर्जेदार वस्तूंची प्रसिद्धी व नागरिकांना खरेदी करता येण्यासाठी महाराष्ट्र कारागृह विभागा मार्फत विविध सणांना राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कारागृह उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळावे आयोजित करण्यात येत असतात.

कारागृह उत्पादित वस्तूंची मोठ्या व्यापक प्रमाणात प्रसिद्धी होणे आवश्यक आहे तसेच कारागृह उत्पादित वस्तू ई-मार्केटप्लेस वर लवकरच नागरिकांसाठी खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात येतील.

कारागृहात अनेक सुधारणा करणे गरजेचे आहे जश्या जश्या सुधारणा होत जातील तसे तसे आपल्याही लक्षात येईल की सुधारणा होत आहेत. कायद्यानुसार बंद्यांना ज्या सोयी-सुविधा देणे गरजेचे आहेत त्या सोयी-सुविधा देण्यात येतील व कायद्यानुसार ज्या सोयी सुविधा देता येणार नाहीत त्याचे काटेकोरपणे पालन केले जाईल .

सदरचे प्रदर्शन व विक्री दि 11/01/2023 ते दि. 26/01/2023 या कालावधीत उद्योग विक्री केंद्र, येरवडा मध्यवर्ती कारागृह, येरवडा पुणे येथे सुरु राहणार आहे.

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!