केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील नाशिकजवळ इगतपुरी इथे 1800 कोटी रुपये खर्चाच्या आठ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन..!!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, नितीन गडकरी यांच्या हस्ते आज महाराष्ट्रात, नाशिक जिल्ह्यात इगतपुरी इथे 226 किमीच्या 1800 कोटी रुपये खर्चाच्या आठ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी झाली. यावेळी, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, खासदार डॉ. सुभाष भामरे आणि हेमंत गोडसे तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या महामार्ग प्रकल्पांमुळे, जिल्हयातील वाहतुकीला वेग येईल तसेच, सुरक्षित, इंधन व वेळेची बचत करणारे उत्तम रस्ते उपलब्ध होतील. तसेच प्रदूषणही कमी होईल. त्याशिवाय, शेतकरी आणि कारागिरांनाही, स्थानिक बाजारांपर्यंत आपली उत्पादने घेऊन जाणे सोपे होईल. ग्रामीण भागही मुख्य रस्त्यांशी, पर्यायाने शहरांशी जोडला जाईल. ज्यामुळे उद्योगात वाढ होऊन, रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होतील.