ताज्या घडामोडीपुणेसामाजिक

कोंढवा पोलीस स्टेशन येथे झाली सर्वधर्म समभाव गणपती आरती

वर्तमान टाईम्स, वृत्तसेवा:- कोंढवा पोलीस स्टेशन येथे गणपती विसर्जनानिमीत्त सामजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी कोंढवा पोलीस स्टेशन व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने (सर्व धर्म समभाव गणती आरती) चे आयोजन करण्यात आले होते. कोंढवा पोलीस स्टेशन येथे मुस्लीम बांधवाच्या हस्ते गणपती बाप्पाची आरती करण्यात आली. धार्मीक सखोला टिकविण्यासाठी अखंडपणे प्रयत्न करणा-या सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते गणपती बाप्पाची सर्व धर्म समभाव आरती करण्यात आली.

मा. अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग श्री. रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ ५ श्री. विक्रांत देशमुख, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. शाहुराजे साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलीस स्टेशन श्री. संतोष सोनवणे यांच्या संकल्पनेतुन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री संदिप भोसले पोलीस निरीक्षक गुन्हे १, श्री संजय मोगले पोलीस निरीक्षक २, व पोलीस स्टेशन कडील स्टाफ तसेच शांतता कमिटी, मोहल्ला कमिटी, विघ्नहर्ता न्यास कमिटी, एस.पी.ओ तसेच इतर लोक हजर होते.

तर कार्यक्रमानंतर गणपती बाप्पाची विधीपुर्वक कोंढवा पोलीस स्टेशन ते प्रतिभा ताई शाळे जवळील विर्सजन हौद अशी भव्य मिरवणुक काढण्यात आली.

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!