ताज्या घडामोडीपुणे

कोयता गँग विरुद्ध पुणे पोलीसांकडून मोक्कानुसार कारवाई..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- पुणे शहरातील हडपसर परिसरात संघटित गुन्हेगारी करुन कोयत्याचा धाकाने नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या टोळीविरुद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी कोयता गँग विरुद्ध मोक्कानुसार कारवाई करीत टोळ्यांना इशारा दिला आहे. दरम्यान, कोयता गँग टोळीविरुद्ध कारवाई मुळे अल्पवयीन आरोपींमध्ये दहशत निर्माण होण्यास मदत होणार आहे.

समिर लियाकत पठाण (वय-26 टोळी प्रमुख) याच्यासह शोएब लियाकत पठाण, गणेश ऊर्फ दादा विठ्ठल हवालदार, वय 22 रा. मांजरी, प्रतिक ऊर्फ एस. के. हनुमंत कांबळे, वय – 20, रा. साई श्रध्दा पार्क, गोपाळपट्टी मांजरी, गितेश दशरथ सोलनकर, वय 21 ऋतिक संतोष जाधव, वय- 19 राजेंद्र कांबळे, वय – 20 ऋषिकेश ऊर्फ सोन्या संजय पखाले, वय-24 ऋतिक – सुनिल मांढरे, वय 22 प्रतिक शिवकुमार सलगर, वय- 19 अशी मोक्कानुसार कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत

हडपसरमधील मांजरी बुद्रुक परिसरात 8 ते 10 जणांच्या – टोळक्याने दोघांना बेदम मारहाण करीत नागरीकांना शिवीगाळ केली होती. मोटार सायकलवरुन पळुन जाताना कोयते हवेत फिरवत नागरीकांना आम्ही इथले भाई आहे, तुम्हाला परत येवुन बघतो असे म्हणुन दहशत निर्माण केली. याप्रकरणी मुख्य आरोपी समिर लियाकत पठाण आणि इतर गणेश ऊर्फ दादा विठ्ठल हवालदार यांच्यावर शहरात वेग-वेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये दरोडा, मारामारी, जबरी चोरी असे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याविरुद्ध मोक्कानुसार कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्यावतीने अपर पोलीस आयुक्त रंजन शर्मा याना पाठविला. त्यानुसार टोळीविरुद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली. सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई तपास करीत आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त, रितेश कुमार, सहआयुक्त, संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रंजन शर्मा, पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे, पोलीस निरीक्षक विश्वास डगळे, एपीआय विजयकुमार शिंदे, पोलीस उप-निरीक्षक, अविनाश शिंदे, समीर पांडुळे, शाहीद शेख, हंबर्डे, दुधाळ, सोनवणे सर्व्हेलन्स विभागाचे पोलीस अंमलदार, प्रविण शिंदे, गिरीष एकगे यांनी केली आहे.

  • पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार मोक्का अंतर्गत केलेली ही दुसरी कारवाई आहे.

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!