कोरेगाव पार्क परीसरात मोठया आवाजात साऊंड सिस्टीम लावणाऱ्या टल्ली रेस्टॉरंट अॅण्ड बार वर धडक कारवाई..!!
सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा पुणे शहर यांचेकडुन साऊंड सिस्टीम, डिजे मिक्सर जप्त..!!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- कोरेगाव पार्क परीसरात मोठया आवाजात साऊंड सिस्टीम लावुन रात्री १०.०० वा. नंतर संगीत वाजवणारे टल्ली रेस्टॉरंट अॅण्ड बार वर कारवाई करून साऊंड सिस्टीम, डिजे मिक्सर जप्त करण्यात आले आहेत.
सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे कोरेगाव पार्क परीसरात पेट्रोलिंग करीत असताना आऊट ऑफ द वर्ड बिल्डींग, लेन नं ७ कोरेगाव पार्क, पुणे येथे टल्ली रेस्टॉरंट अॅण्ड बार मध्ये मोठया आवाजात सांऊड सिस्टिमचा आवाज येत असल्याचे त्यांचे निदर्शनास आले.
त्यांनतर त्यांनी सदर ठिकाणी खात्री केली असता टल्ली रेस्टॉरंट अॅण्ड बार, कोरेगांव पार्क, पुणे येथे मोठया आवाजात सांऊड सिस्टिमवर संगित सुरू असल्याचे आढळल्याने सामाजिक सुरक्षा पथकाने या हॉटेलवर कारवाई करून ०४,८०,०००/- रू. चे (चार लाख ऐंशी हजार ) किंमतीचे साऊंड सिस्टिम जप्त केली असुन हॉटेलचे मालक व मॅनेजर विरूध्द पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत ध्वनी प्रदुषण (विनियमन व नियंत्रण सन २००० ) अधिनियम अन्वये कारवाई करण्यात आली आहे. कार्यवाहीच्या ठिकाणी ध्वनीप्रदुषण व पर्यावरण संरक्षण कायद्या अन्वये ध्वनीप्रदुषण नियमावली नुसार कारवाई करणेकामी जप्त मुद्देमाल (साऊंड सिस्टीम) कोरेगांव पार्क पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलेला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, पुणे शहर, श्री. अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री भरत जाधव तसेच सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार अजय राणे, इरफान पठान, अमित जमदाडे या पथकाने यशस्वी केली आहे.