आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण हक्कांची सनदची माहिती दर्शनी भागात लावा..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- जिल्ह्यातील सर्व खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण हक्कांची सनदची माहिती दर्शनी भागा लावण्यात यावी, अशी सामाजिक पुरस्कारप्राप्त तथा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य चंद्रकांत खरात यांनी केली आहे.

चंद्रकांत खरात यांनी आरोग्य मंत्री, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, उपविभागीय कार्यालय, शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्ह्यातील अधिनस्त प्रत्येक खासगी रुग्णालयांनी रुग्ण हक्काची सनद व दरपत्रक (द चार्टर ऑफ पेशंट राईट्स) ची माहिती दर्शनी भागात लावणे कायद्याने बंधनकारक आहे. परंतु जिल्ह्यातील बहुतांश रुग्णालयामध्ये रुग्णांच्या हक्काची सनद दर्शनी भागातलावलेली निदर्शनास येत नाही याची नोंद घेण्यात घ्यावी. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जुन २०१९ मध्ये सर्व राज्यांमध्ये रुग्ण हक्काची सनद खाजगी व सरकारी रुग्णालयांमध्ये दर्शणी भागात लावण्याचे आदेश जारी केले होते. राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने सप्टेंबर २०२० आणि मे २०२१ मध्ये या विषयी आदेश निर्गमित केले आहेत. कोरोना काळातील खासगी रुग्णालयांमधील गैरप्रकार व रुग्णांचे झालेले शोषण याची दखल सरकारने घेऊन राज्याच्या आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना आदेश दिले होते. रुग्ण हक्काच्या सनदमध्ये नागरिकांना प्राप्त असलेले अधिकार, आजाराच्या प्रकाराची माहिती मिळण्याचा हक्क, तपासण्यांचे तपशील, उपचारांचे परिणाम, अपेक्षित खर्च, तपासण्यांचे अहवाल व सविस्तर बिले मिळण्याचा मुलभूत हक्क या सारखे अनेक रुग्ण हक्काचा सदर सनद मध्ये समावेश आहे.

…तर परवाना रद्द करावा

सर्व नोंदणीकृत खासगी रुग्णालयात १५ दिवसांत रुग्ण हक्कांची सनद (द चार्टर ऑफ पेशंट राईट्स) ची माहिती तत्काळ दर्शनी भागात लावण्यात यावी व त्याबाबतचा अहवाल कार्यालयास सादर करण्याचे आदेश निर्गमित करावेत. सदर आदेशाचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांचा परवाना रद्द करण्यात यावा. मी दाखल केलेल्या या तक्रारीवर शासनाने निर्धारित केलेल्या मुदतीत अंतिम कार्यवाही करून तक्रार निकाली काढावी, अशी मागणी चंद्रकांत खरात यांनी केली आहे.

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!