खुन करण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगार धारदार शस्त्रासह कोंढवा पोलिसांनी केले जेरबंद..!!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- युनिट-५ गुन्हे शाखेकडील मा. पोलीस निरीक्षक, उल्हास कदम यांचे मार्गदर्शनाखाली व आदेशान्वये युनिटकडील सहा. पोलीस निरीक्षक, कृष्णा बाबर, पोलीस अंमलदार, आश्रुबा मोराळे, दिपक लांडगे, राहुल ढमढेरे असे युनिट कार्यक्षेत्रात कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत असताना पोलीस पथकास बातमी मिळाली की एक इसम हा हातात सुरा घेऊन गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याचे उद्देशाने लक्ष्मीनगर, कोंढवा येथे उभा आहे अशी बातमी मिळाली.
वरिष्ठांचे आदेशान्वये सापळा लाऊन रेकॉर्डवरील गुन्हेगार अरबाज उर्फ लॅब इलियाज खान, वय-२४ वर्षे, रा. अश्रफअलीनगर, कोंढवा, पुणे यास त्याचेकडील धारदार हत्यारासह ताब्यात घेण्यात आले. त्याचेकडे सखोल विचारपुस करता त्याने सांगितले की, त्याचे पत्नीस व त्याला त्रास देणा-या इसमास जीवे ठार मारण्यासाठी हत्यारासह चाललो आहे असे सांगितल्याने नमुद आरोपीस ताब्यात घेवुन, त्याचेकडुन धारदार शस्त्र जप्त करुन त्याचेविरुध्द कोंढवा पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५) प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन, त्याचेकडुन घडणा-या गंभीर स्वरुपाच्या गुन्हयास प्रतिबंध केला आहे..
अरबाज उर्फ लॅब इलियाज खान हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन, त्याचेवर कोंढवा पोलीस ठाणे येथे खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, मारहाण, दंगल यासारखे ०६ गुन्हे दाखल असून नुकत्याच कोंढवा पोलीस ठाणे येथे दाखल झालेल्या दंगलीचा व हत्यार घेऊन दुकाने बंद करुन दहशत पसरविणे या सारख्या दोन गुन्हया मध्ये पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. सहा. पो. आयुक्त गुन्हे – २ श्री नारायण शिरगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-५ कडील पोलीस निरीक्षक, उल्हास कदम, सहा. पोलीस निरीक्षक, कृष्णा बाबर, पोलीस अंमलदार, रमेश साबळे, आश्रुबा मोराळे, दिपक लांडगे व राहुल ढमढेरे यांनी कामगिरी केली आहे.