क्राइमताज्या घडामोडीपुणे

खुन करुन पसार झालेल्या रिक्षा चालकास कर्नाटक येथून खडकी पोलीसांनी केले जेरबंद..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- दि. २४/०४/२०२३ रोजी महिला रजनी राजेश बेकेल्लु, वय ४४ वर्षे, हे नोकरीकरीता त्यांचे मोपेड गाडीवर जात असताना सकाळी ०८/३० वा. सुमारास स्टेशन हेडक्वार्टर रोड, खडकी पुणे येथे कोणतरी अज्ञात व्यक्तिने त्यांच्या मानेवर व इतर ठिकाणी चाकुने वार करुन गंभीर जखमी करुन खून केला होता त्याबाबत खडकी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यातील आरोपीबाबत नातेवाईकांकडे अधिक तपास करतांना मयत झालेली महिला ही स्टेशन हेडक्वॉर्टर, खडकी पुणे येथे नोकरीस होत्या व त्यांचा दोन वर्षापुर्वी अपघात झाल्याने त्यांनी नोकरीकरीता येणे जाणेकरीता भाड्याने रिक्षा लावली होती अशी माहीती मयताचे नातेवाईकांनी दिली. त्याबाबत अधिक तपास करता रिक्षाचालक नसिर बिराजदार हा यातील मयत महिलेवर एकतर्फी प्रेम करत असलेबाबत व त्यास मयत महिलेचा विरोध असल्याच्या कारणांवरुन खुन केल्याचे पोलीसांना तपासात निष्पन्न झाले होते.

यातील आरोपी रिक्षाचालक नसिर बिराजदार याचा व त्याच्या साथिदाराचा खडकी पोलीस स्टेशनकडील पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. मानसिंग पाटील, तपासपथक प्रभारी पोलीस उप निरीक्षक वैभव मगदुम, व स्टाफ असे शोध घेत असताना आरोपीबाबत तांत्रीक तपास करुन व बातमीदारामार्फत बातमी मिळाली की आरोपी हा विजापुर, कर्नाटक येथे लपुन बसलेला आहे.

मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक वैभव मगदुम, सपोफौ. तानाजी कांबळे, पो.ना. संदेश निकाळजे, पो.शि. ऋषिकेश दिघे, म.पो.शि. स्वाती म्हस्के असे विजापुर कर्नाटक येथे जावून आरोपीस शिताफिने ताब्यात घेवुन खडकी पोलीस स्टेशन येथे आणले व त्याच्याकडे गुन्ह्याबाबत अधिक तपास करतांना त्याने गुन्हा केलेचे कबुल केल्याने त्यास दाखल गुन्ह्यात दि. २६/०४/२०२३ रोजी अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी मा. रंजनकुमार शर्मा सो, अपर पोलीस आयुक्त सो, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. श्री. शशिकांत बोराटे, पोलीस उप आयुक्त सो, परिमंडळ ०४, पुणे शहर, मा. आरती बनसोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे शहर श्री. विष्णु ताम्हाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडकी पोलीस स्टेशन पुणे शहर, श्री. मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, तपास पथकाचे पोउप निरीक्षक वैभव मगदुम, सपोफौ तानाजी कांबळे, पो.ना. निकाळजे, पो.ना. कलंदर, पो.ना. शेख, पो.शि. सुधीर अहिवळे, पो.शि. अनिकेत भोसले, पो.शि, ऋषिकेश दिघे. म.पो.शि. स्वाती म्हरके यांनी केलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक अमर कदम, खडकी पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत.

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!