गांजा विक्री करणा-या सासु-सुनेला गुन्हे शाखाकडुन अटक..!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा
पुणे प्रतिनिधी
अंमली पदार्थ विरोधी पथक १ चे पोलीस निरीक्षक श्री गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, सहा पोलीस निरीक्षक शैलजा जानकर व स्टाफ लोणीकाळभोर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात चोरघे वस्ती, श्री सदगुरु रोझ नर्सरी, सोरतापवाडी, पुणे येथील सार्वजनिक रोडवर पेट्रोलिंग करीत असताना दोन महिला आपल्या डोक्यावर नायलॉनच्या पांढ-या रंगाच्या पिशव्यांचे सुतळीने बांधलेले बाजके (प्रत्येकी एक-एक पिशवी प्रमाणे) घेवुन असताना दिसले.
त्यांना कायदेशिर सोपस्कार पार पाडुन त्यांचेकडील पोत्याची झडती घेतली असता एका महिलेच्या ताब्यात कि.रु. २,०४,९००/- चा १० किलो २४५ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ व किं. रु. १,०००/- चा एक मोबाईल हॅण्डसेट तसेच दुसरी महिला हिच्या ताब्यात कि.रु. रु.२,०७,३००/- चा १० किलो ३६५ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ असा एकुण कि. रु. ४,१२,२००/- चा २० किलो ६१० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गु.र.नं. ६२२ / २०२२, एन. डी. पि. एस. अॅक्ट कलम ८ (क), २० ( ब ) (ii) (क), २९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक धायगुडे लोणीकाळभोर पोलीस स्टेशन पुणे हे करीत आहे.