गॅस एजन्सीमध्ये रक्कम गुंतविल्यास बँकेपेक्षा चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधींची घातला गंडा
नागरीकांची फसवणुक झाली असल्यास संपर्क साधावा- पोलीसांचे आवाहन
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :-गॅस एजन्सीमध्ये रक्कम गुंतविल्यास बँकेपेक्षा चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून व रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाची कोणतीही परवानगी नसताना वार्षिक १२ टक्के व्याजाच्या खोटया एफडी सर्टीफिकेटस देवुन आर्थिक फसवणुक करणारे बाप- लेक उदय त्र्यंबक जोशी व त्यांचा मुलगा मयुरेश उदय जोशी रा. पानमळा, दांडेकर पुल, पुणे यांच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस स्टेशन गु.र.नं. २१० / २०२३ भादंवि कलम ४२०, ३४ सह महाराष्ट्र ठेवीदारांचे हितरक्षण अधिनियम १९९९ (एमपीआयडी) कायदा कलम ३ अन्वये दिनांक २३/०९/२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
गॅस एजन्सीमध्ये रक्कम गुंतविल्यास बँकेपेक्षा चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून आरोपी उदय त्र्यंबक जोशी व त्यांचा मुलगा मयुरेश उदय जोशी यांनी अनेकांना कोटयावधी रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आत्तापर्यंत ०९ जणांनी पुढे येवून त्यांची ५ कोटी ५३ लाख ८ हजार रुपयांची फसवणुक झाली असुन त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी दिल्या आहेत.
आरोपी मयुरेश जोशी याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाची कोणतीही परवानगी नसताना वार्षिक १२ टक्के व्याजाच्या खोटया एफडी सर्टीफिकेटस फिर्यादी यांना देवून अनेकांची फसवणुक केली आहे.
या दोन्हीही आरोपी उदय त्र्यंबक जोशी व त्यांचा मुलगा मयुरेश उदय जोशी यांनी अशा प्रकारे कोणाची फसवणुक केली असेल, तर त्यांनी सर्व कागदपत्रांसह श्री. गुरुदत्त मोरे, पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, पुणे शहर, मो. नं. ७३५००८७२६६ यांचेशी संपर्क साधावा असे पुणे पोलीसांकडुन आवाहन करण्यात आलेले आहे.