चेन स्नॅचींगसह ४ गुन्हयांमध्ये फरार आरोपी जेरबंद
भारती विदयापीठ पोलीस स्टेशनची कामगिरी
पुणे दि. 20 निर्भीड वर्तमान :- पुण्यातील लेकटाऊन रोड, बिबवेवाडी येथुन व कात्रज तळे, लेक साईट सोसायटी जवळून दि.१२/१०/२०२३ रोजी दुचाकी गाडीवरुन आलेल्या दोन चोरांनी गळयातील सोन्याची चैन चोरी केली होती त्याबाबत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा येथे गुन्हा दाखल आहे.
दाखल गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी सागर संदीप शर्मा ऊर्फ भोवते, वय २० वर्षे व त्याचा साथीदार अमोल रविंद्र आडम, वय २४ वर्षे, प्रथमेश ऊर्फे पिल्या प्रकाश ठुमके यांनी गुन्हा केल्याचे पोलीसांना निष्पन्न झाल्याने त्यामधील सागर संदीप शर्मा ऊर्फ भोवते यास यापुर्वी या गुन्ह्यामध्ये १९/१०/२०२३ रोजी अटक करुन त्याच्याकडून दोन सोन्याच्या चैन जप्त करण्यात आल्या आहेत.
परंतू गुन्ह्यातील फार आरोपी अमोल रविंद्र आडम हा मिळून येत नव्हता त्याचा पोलीस शोध घेत असताना पोलीस अंमलदार अभिजीत जाधव व विक्रम सावंत यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, अमोल आडम हा कात्रज, जैन मंदीराजवळ कोणालातरी भेटण्यासाठी थांबलेला आहे.
बातमी मिळाल्याने तात्काळ तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी कात्रज जैन मंदीर येथे जावुन आरोपी आडम याला अटक केली आहे. आरोपी अमोल रविंद्र आडम हा भारती विद्यापीठ, येरवडा, विश्रांतवाडी या पोलीस स्टेशनच्या गुन्हयांमध्ये फरार आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्री. नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस.पाटील, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहा.पो.निरी. अमोल रसाळ, पोलीस अंमलदार अभिजीत जाधव, विक्रम सावंत, शैलेश साठे, चेतन गोरे, महेश बारवकर, निलेश जमदाडे, मंगेश पवार, निलेश ढमढेरे, हर्षल शिंदे, अवधतु जमदाडे, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, अभिनय चौधरी, आशिष गायकवाड, राहुल तांबे, मितेश चोरमोले यांच्या पथकाने केली आहे.