ताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

जनमाहिती अधिकारीसह कनिष्ट अभियंतावर दप्तर दिरंगाई, शिस्तभंगाची कार्यवाहीची मागणी

पुणे, निर्भीड वर्तमान:- पुणे महानगरपालिका बांधकाम विकास विभाग झोन ०३ विभागाचे जनमाहिती अधिकारी व कनिष्ट अभियंता यांच्या विरुद्ध दप्तर दिरंगाई कायदा २००६ व महाराष्ट नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ मधील तरतुदी नुसार कारवाई करण्याची मागणी कार्यकारी अभियंता बांधकाम विकास विभाग झोन ०३ यांच्याकडे निवेदना मार्फतीने करण्यात आली आहे.

दप्तर दिरंगाई
दप्तर दिरंगाई

या प्रकरणातील तक्रारदार यांनी माहिती अधिकारा मध्ये सार्वजनिक हितासाठी माहिती मागीवली होती परंतु टाळाटाळ करत जाणीवपूर्वक तक्रारदार यांना माहिती देण्यात आली नाही म्हणून तक्रारदार यांनी नियमाप्रमाणे पहिला अपील कार्यकारी अभियंता बांधकाम विकास विभाग झोन 03 यांच्याकडे दाखल करत न्याय मागितला होता, कर्तव्यदक्ष कार्यकारी अभियंता श्री.श्रीकांत वायदंडे यांनी तात्काळ सुनावणी घेऊन तक्रारदार यांच्या बाजूने निकाल दिला व सात दिवसात मोफत माहिती देण्याचा व अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता.

परंतु माहिती अधिकार अधिनियमन व वरिष्ट अधिकारी यांच्या आदेशाला श्री. निवृत्ती उतले, श्री. योगेश भोसले, श्री.विश्वनाथ बोटे व इतर अधिकारी यांनी केराची टोपली दाखवत आजरोजी पर्यंत कोणत्याही स्वरूपात तक्रारदार यांना माहिती उपलब्ध काही करुन दिली नाही.

वरिष्ट अधिकारी यांनी आदेश दिल्यानंतर त्यावर नियमाप्रमाणे तात्काळ कार्यवाही होणे आवश्यक होते परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही केली गेली नाही म्हणून संबंधित शासकिय कर्मचाऱ्याने / अधिका-याने दिलेले किंवा त्यांच्याशी संबंधीत असलेले काम कायद्यातील तरतूदी प्रमाणे शक्य तितक्या तत्परतेने पार पाडलेले नाही, म्हणुन दप्तर दिरंगाई कायदा २००६ मधील तरतुदी आणि शासनादेश, महाराष्ट नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ मधील कायदयातील तरतुदीप्रमाणे ते दोषी आहेत तर शिस्तभंगाची कार्यवाही कठोरपणे करण्यात यावी व्यक्तिशा; प्रकारची नोंद त्यांच्या सेवापुस्तकात घेण्यात यावी असे तक्रारीत म्हटले आहे.

बांधकाम विकास विभाग झोन ०३ चे कार्यकारी अभियंता श्री.श्रीकांत वायदंडे हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहे आता पर्यन्त कामामध्ये त्यांनी कोणाचीही गय केलेली नाही आता आपण दिलेल्या आदेशालाच जबाबदार अधिकारी केराची टोपली दाखवत असतील तर अश्या अधिकारी / कर्मचाऱ्यांवर कश्या स्वरूपाची कारवाई करतात आता बघणे महत्वाचे ठरणार आहे.

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!