जेवणात मिठ जास्त झालेचे कारणावरुन हॉटेल चालकाने केला आचाऱ्याच्या खुन..!!
गुन्हे शाखा-३ व शस्त्रविरोधी पथक पिंपरी-चिंचवड कडुन कौशल्यपुर्ण पणे गुन्हा उघड..!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- सविस्तर हकिगत कि, श्री. पद्माकर घनवट, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, पिंपरीचिंचवड यांना त्यांचे गोपणीय बातमिदाराकडुन माहीती मिळाली कि, चाकण पोलीस ठाणे हद्दीतील ओंकार ढाबा,चाकण शिक्रापुर रोड, शेलपिंपळगाव येथे ढाबा चालकाने एक महिण्यांपुर्वी एका परराज्यातील कामगाराचा खुन केला असुन त्याने त्याची मयत बॉडी कोठेतरी फेकुण विल्हेवाट लावली.
मा.अंकुश शिंदे सो. पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड यांना सर्व बातमी कळवुन खातरजमा करणे कामी गुन्हे शाखा, युनिट-३ चे पोलिस निरीक्षक श्री शैलेश गायकवाड यांना आदेशीत केल्यानंतर त्यांचे पथकातील पोलीस उप निरीक्षक गिरीश चामले, व अंमलदार यांनी वेशांतर करुन ओंकार ढाबा येथे जावुन तेथील ढाबा चालक व कामगारांची माहीती काढुन त्यांचे फोटो प्राप्त केले.
त्यानुसार शस्त्र विरोधी पथकाचे स.पो.नि. देशमुख व पथक तसेच गुन्हे शाखा युनिट-३ चे पो.उप.नि. चामले व पथक यांनी शेलपिंपळगाव येथुन संशयीत आरोपी ढाबा चालक नामे ओंकार अण्णाराव केंद्रे, वय-२१ वर्षे, राओंकार ढाबा, चाकण शिक्रापुर रोड, शेल पिंपळगाव, ता.खेड, जि. पुणे मुळ रा. दिग्रस, ता. कंधार, जि. नांदेड व त्याचा लहान भाऊ कैलास अण्णाराव केंद्रे वय १९ वर्षे, रा. ओंकार ढाबा, चाकण शिक्रापुर रोड, शेलों पिंपळगावता. खेड, जि. पुणे मुळ रा. दिग्रस, ता. कंधार, जि. नांदेड यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे गुन्हे शाखा युनिट-३ येथे आणुन कौशल्यपुर्ण तपास केला कि, दोघांनी मिळुन त्यांचे ढाब्यावर ०७ दिवसांपुर्वीच आचारी काम करण्यास आलेला प्रसेनजीत गोराई वय-३५ वर्षे राज्य पश्चिमबंगाल यास त्यांचे जेवनात मिठ जास्त झाल्याचे कारणावरुन झालेल्या वादावादीतुन दि.२६/१०/२०२२ रोजी रात्री दरम्याण ओंकार ढाबा चाकण शिक्रापुर रोड, शेल पिंपळगाव, ता.खेड, जि. पुणे येथे त्याचे डोळयामध्ये मिरची पावडर टाकुन त्यास लाकडी दांडके, लोखंडी रॉड व वायर ने मारहाण करुन जिवे ठार मारले व त्याची मयत बॉडी तशीच दिवसभर ढाब्यावरील आतल्या खोलीत लपवुन ठेवली. व दि.२८/१०/२०२२ रोजी चे पहाटे दरम्याण सदर मयत्त बॉडी’ वैष्णवी ढाबा, शेलपिंपळगाव, ता. खेड, जि. पुणे चे मागे असलेल्या डोंगराळ भागातील एका ओढयात फेकुन विल्हेवाट लावली पुढे केलेल्या तपासात चाकण पोलीस ठाणेचे अभिलेखावर दि. ०६/११/२०२२ रोजी अकस्मात मयत रजि.क्र. ३३५ / २०२२ सी.आर.पी.सी. १७४ प्रमाणे नोंद असलेल्या प्रकरणातील मयत बॉडी ही मयत प्रसेनजीत गोराई याची असल्याचे निष्पन्न झाले. गुन्हा उघडकिस आणुन दोन्ही आरोपींना चाकण पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास चाकण पोलीस स्टेशन करत आहे.
सदर प्रकार हा त्यांनी ढाव्यावर कामास असलेल्या अन्य ३ परराज्यातील कामगारापुढेच केला होता. परंतु त्यांनी त्यांना सुध्दा जिवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याने त्यांनी तो प्रकार कोणासही न सांगत घाबरुन ते तेथेच काम करत होते
सदर किचकट गुन्हयाची उकल मा. पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे सो. मा. अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे सो.पोलीस उप आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर सो. सहायक पोलीस आयुक्त पदमाकर घनवट साो. यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, स.पो.नि. अंबरीश देशमुख (शस्त्रविरोधी पथक), पो.उप-निरीक्षक गिरीश चामले, पो.हवा./४७९ सानप, पो.हवा/७५५ आढारी, पो. हवा / ९१९ मोरे, पो.ना./१४५६ भोसुरे, पो. शि. / १९४० हनमंते, पो. शि. / २३९९ बाळसराफ, पो.शि./२७१८ सुर्यवंशी, पो. शि/१२८१ कोळेकर, पो. शि. / २२७३ दांगट, पो. शि. / २८९५ फापाळे, पो. शि. / २८८३ काळे, पो.शि./२८७७ मिरगळ, पो.शि./२२९६ जैनक, पो.ना./ १६६६ भालचिम, पो.ना./११४४ लांडे, पो.शि. / २००१ नांगरे यांनी तसेच शस्त्रविरोधी पथकाचे सहा फौजदार शाम शिंदे, एल. के वाव्हळे, पो.हवा./६४६ प्रितम वाघ, पो. हवा / ९०१ वसिम शेख, पो. शि. / २३८२ शेळके यांचे पथकाने केली आहे. तांञीक विष्लेशन शाखा पोलीस हवालदार माळी यांनी तपास पथकास विषेश सहकार्य केलेले आहे.