डॉ. ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ यांचा “भारतरत्न गौरव श्री” पुरस्कार – 2023 देऊन करण्यात आला गौरव..!!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- सध्याच्या धावपळीच्या युगात प्रत्येक व्यक्ती ताणतणावाच आयुष्य जगत आहे, एका जीवघेण्या स्पर्धेचा बळी पडत आहे आणि याचा परिणाम त्याच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होत आहे.
प्रत्येक माणसाचा शारीरिक व मानसिक विकास व्हावा यासाठी डॉ. ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ (मनोविकास तज्ञ, बाल मानस तज्ञ, समुपदेशक व प्रशिक्षक) समुपदेशन व प्रशिक्षणाच्या माध्यमातून गेली १७ वर्ष कार्य करत आहेत, सरांचे दुर्वा एज्युकेशन समुपदेशन व प्रशिक्षण केंद्र डोंबिवली – मुंबई येथे आहे. तसेच सरांची फाऊंडेशन देखील आहे.
फाऊंडेशनच्या माध्यमातून आता पर्यंत अनेक मोफत उपक्रम राबविण्यात आले आहेत. यामध्ये ५ दिवसीय मोफत योग शिबीर, ५ दिवसीय मोफत आरोग्य शिबीर, ३ दिवसीय मोफत व्यक्तिमत्व विकास शिबीर, २ दिवसीय मोफत प्राणायाम शिबीर, ५ दिवसीय मोफत अभिनय शिबीर आदि. अश्या अनेक विषयांचा सहभाग आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला एक मोफत शिबिराचे आयोजन केले जाते. डॉ. ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ यांच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाची नोंद आंतरराष्ट्रीय मानव हक्क सेवा संघ महाराष्ट्र व आदर्श मुंबई वृत्तपत्राचे सर्वेसर्वा डॉ. संजय भोईर सर यांनी घेतली व सन्मान महाराष्ट्राचा – गौरव कार्यकर्तुत्वाचा या विचारातून या वर्षीचा “भारतरत्न गौरव श्री” पुरस्कार २०२३ डॉ. ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ यांना सन्मानित केले आहे.
सदर पुरस्कार वितरण सोहळा हा आर्दश मुंबई वृत्तपत्राच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त धर्मवीर आनंद दिघे सभागृह, विक्रोळी- मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. हा पुरस्कार वितरण सोहळा अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी राज्य भरातून विविध क्षेत्रातील मंडळींनी सभागृहात हजेरी लावली व पुरस्कार वितरण सोहळ्याची शोभा वाढवली. या पुरस्काराबद्दल डॉ. ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ यांनी आंतरराष्ट्रीय मानव हक्क सेवा संघ महाराष्ट्र व आदर्श मुंबई वृत्तपत्राचे सर्वेसर्वा डॉ. संजय भोईर सर यांचे मनपूर्वक आभार मानले आहेत.