डॉ. ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ यांना राज्यस्तरीय आपले मानवाधिकार आरोग्य दूत पुरस्कार 2022 देऊन गौरव..!!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- डॉ. ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ – मनोविकास तज्ञ, बाल मानस तज्ञ यांना राज्यस्तरीय आपले मानवाधिकार आरोग्य दूत पुरस्कार 2022 देऊन गौरविण्यात आले.
डॉ. ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ यांनी दुर्वा एज्युकेशन समुपदेशन व प्रशिक्षण केंद्र (ISO Certified) तसेच डॉ. ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ फाउंडेशन (महाराष्ट्र शासन मान्य संस्था) च्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करत असताना लोकांचे मानसिक स्वास्थ चांगले राहावे यासाठी विविध उपक्रम राबवले व त्याचा लाभ अनेकांनी घेतला. यामध्ये योग शिबिर, प्राणायाम, ध्यान शिबिर, व्यक्तिमत्त्व विकास शिबिर, मानसिक स्वास्थ्य व्याख्यान आदींचा समावेश आहे.
यामध्ये शालेय व कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचे बदलते भावविश्व आणि शारीरिक व मानसिक बदल यांबद्दल व्याख्याने यांचा देखील समावेश आहे. डॉ. ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ यांच्या याच कामाची दखल आपले मानवाधिकार फाउंडेशन यांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली व या वर्षीचा राज्यस्तरीय आपले मानवाधिकार आरोग्य दूत पुरस्कार 2022, दिनांक 11 डिसेंबर 2022 रोजी थोर समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत देऊन गौरविण्यात आले.