पुणे

तळेगाव दाभाडे येथील भरदिवसा पडलेल्या दरोडयातील आरोपी केले गजाआड..!!

पिंपरी चिंचवड आयुक्तालय हददीतील १२ चैन स्नॅचिंगचे गुन्हेही उघड पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट-३ ची कामगिरी..!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- तळेगांव दाभाडे पोलीस ठाणे हददीत दिनांक 10/1/2023 रोजी दुपारी 5 अनोळखी इसमांनी भरदिवसा दरोडा टाकुन 24 तोळे सोने व रोख रक्कम चोरी करुन पळुन गेले होते. या बाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्हयाचा तपास मा. वरीष्ठांनी गुन्हे शाखा युनिट 3 कडे वर्ग केला होता. गुन्हे शाखा युनिट 3 कडील पोहवा.विठठल सानप व पोशि. रामदास मेरगळ यांना गुन्हयामध्ये सहभाग असणारे आरोपींची खात्रीशीर माहीती आपल्या बातमीदार कडून मिळाल्याने गुन्हयातील आरोपींचा शोधु घेवुन सापळा रचला व आरोपी अमर हरिदास दहातोंडे वय 20 वर्षे, अनिल गोरखनाथ मस्के वय 30 वर्षे, राजु रविशंकर यादव वय 42 वर्षे, सोपान अर्जुन ढवळे वय 24 वर्षे, प्रशांत राजु काकडे वय 30 वर्षे, यांना गुन्हे शाखा युनिट 3 ने अटक केले आहे.

यातील आरोपी राजु यादव व सोपान ढवळे यांना हॉटेल व्यवसाय करायचा असल्याने ते पैश्याची जमवामवी करीत असताना तळेगांव परीसरात फिरत असताना त्यांना समजले की, फिर्यादी हा पुर्वी गुटख्याचे व्यापारी आहे तसेच पुर्वी जेल मध्ये असल्याने त्यांचे घरी भरपुर काळा पैसा दडवुन ठेवलेला आहे असे समजले नंतर राजु यादव व त्याचे साथीदार अनिल मस्के, अमर दहातोंडे, प्रशांत काकडे, सोपान ढवळे यांनी संगनमत करुन हत्यारांची जमवाजमवी केली आणी दरोडा टाकल्याचे कबुल केले आहे.

इतर दोन आरोपी अनिल मस्के व अमर दहातोंडे यांचेकडे अधिक तपास केला असता त्यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालय हददीतील चाकण,आळंदी, दिघी,भोसरी, भोसरी एमआयडीसी, चिखली, तळेगाव दाभाडे परीसरातील एकुण 12 चैन स्नॅचिंगचे गुन्हे केले असल्याचे सांगुन सदर आरोपीकडून सदर चैनस्नॅचिंग गुन्हयातील एकुण 190 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे हस्तगत केले आहेत.

याप्रमाणे गुन्हे शाखा युनिट 3 ने एकुण 5 आरोपी अटक करुन एक दरोडयाचा गुन्हा, 12 चैन स्नॅचिंगचे गुन्हे, तसेच गुन्हयात वापरलेल्या दोन मोटर सायकल जप्त करुन एक मोटर सायकल चोरी लोणीकंद पो स्टे चा गुन्हा उघड, एकुण 02 पिस्तुले 22 जिवंत काडतुसे, 1,00,00/- रुपये रोख रक्म, 430 ग्रॅम सोन्याचे दागिणे हस्तगत करुन एकुण 25,27,000/- रुपयेचा मुददेमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई ही मा.पोलीस आयुक्त, श्री. विनयकुमार चौबे, मा. सह. पोलीस आयुक्त श्री. मनोज लोहिया मा. अपर पोलीस आयुक्त श्री. संजय शिंदे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीमती. स्वप्ना गोरे, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले, पोलीस अंमलदार- यदु आढारी, सचिन मोरे, ऋषीकेश भोसुरे, सागर जैनक, राजकुमार हनमंते, योगेश्वर कोळेकर, त्रिनयन बाळसराफ, राहुल सुर्यवंशी, सुधिर दांगट, महेश भालचिम, विठठल सानप, समीर काळे, निखील फापाळे, शशिकांत नांगरे, रामदास मेरगळ यांनी केली आहे

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!