ताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड व ईतर अधिकारीयांचे विरोधात कार्यवाहीसाठी आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण

( आज 10 वां दिवस, लाल फित शाहीत अडकली प्रस्तावित केलेली कार्यवाही )

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत सूक्ष्म सिंचन योजनेमध्ये विविध साहित्य सामग्री खरेदी प्रक्रियेत सिंदखेडराजा तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड व त्यांचे अधिनस्त कर्मचारी यांनी संबंधित वितरका सोबत आर्थिक व्यवहार करून शासनाचे जवळपास 76 लाख रुपयांचे नुकसान केल्याचे संयुक्त चौकशी दरम्यान सिद्ध झाल्यानंतर या प्रकरणात कृषी विभागाने तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड यांना पाठीशी घालून त्यांचे अधिनस्त कर्मचारी यांचे विरोधात निलंबनाच्या कार्यवाहीसह फौजदारी गुन्हे दाखल केले मात्र यातील मुख्य घोटाळेबाज अद्यापही सही सलामत असून त्यांचे विरोधात दोषारोप पत्र एक ते चार बजावूनही त्यांचे विरोधातील सर्व कागदपत्रे लाल फित शाहीत अडकल्याने नाईलाजास्तव सामजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांनी दिनांक 2 ऑक्टोबर 23 पासून मुंबई येथे आझाद मैदानावर राठोड यांचे विरोधात कार्यवाहीसाठी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती वर्तमान टाईम्स वृत्तसेवेला देत असतांना सामजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात सांगितले की सिंदखेडराजा येथे कार्यरत तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड यांनी शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत सूक्ष्म सिंचन योजनेमध्ये ठिबक तुषार साहित्य प्रक्रियेमध्ये अधिनस्त कर्मचाऱ्यांच्या संगणमताने संबंधित वितरकाकडे आर्थिक हित जोपासत शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी त्यांनी शासनाच्या कृषी विभागाच्या संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली होती व तक्रारीचा पाठपुरावा केला होता चौकशी अंति संयुक्त चौकशीमध्ये 76 लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल जिल्हा कृषी अधीक्षक बुलढाणा यांनी शासनाकडे सादर करून या प्रकरणात जे जे अधिकारी कर्मचारी व वितरक दोषी आहेत त्यांचे विरुद्ध कारवायाची शिफारस करण्यात आली होती या अहवालावरून कार्यालयातील पाच कर्मचारी यांचे विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली व वितरकाचे विरोधात फौजदारी कारवाई करण्यात आली व पोलिसांच्या चौकशीमध्ये निलंबन झालेले पाचही कर्मचारी दोषी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या पाचही कर्मचाऱ्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले मात्र हे होत असताना तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड हेही तेवढेच दोषी असताना शासन स्तरावरून त्यांना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून करण्यात आला त्यांचे विरोधात केवळ दोषारोप पत्र एक ते चार बजावण्यात आले मात्र कार्यवाही शून्य होत असल्यामुळे चंद्रकांत खरात यांनी वसंत राठोड यांच्यावर योग्य ती कार्यवाही होण्यासाठी दोन ऑक्टोबर पासून मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.

या उपोषणाच्या दहावा दिवसापर्यंत संबंधित विभागाकडून कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती मिळाली आहे सिंदखेडराजा तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड यांनी त्यांच्या कार्यकाळात प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचन योजना सन 2021/ 22 अंतर्गत ठिबक तुषार साहित्यामधील तफावती व गैर व्यवहार प्रकरणी तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड यांच्यावर विभागीय चौकशी करणे बाबत प्रस्तावित करण्यात आलेली आहे दिनांक 21 जानेवारी रोजी विभागीय कृषी सहसंचालक अमरावती यांनी राज्याचे कृषी आयुक्त यांच्याकडे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 मधील नियम 8/12 खालील सुधारित प्रस्ताव सादर करण्यात आला मात्र कृषी आयुक्तांनी तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड व ईतर अधिकारी यांना पाठीशी घातल्याने अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचन योजना सन 2021/22 अंतर्गत ठिबक, तुषार साहित्यामधील गैरव्यवहार केल्याप्रकरणी जिल्ह्यातील देऊळगाव राजा आणि सिंदखेडराजा तालुक्यात दडलय काय गेल्या बारा वर्षापासून सेवा बजावत असलेल्या राठोड यांनी शासनाच्या नियमानुसार एका तालुका कृषी कार्यालयात तीन वर्षे सेवा तर एका जिल्ह्यात सहा वर्षे सेवा देता येते मात्र हे महाशय तर एक तप म्हणजेच बारा वर्षे उलटूनही हे दोन तालुके सोडण्यास तयार नाहीत.

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!