ताज्या घडामोडी

दहशत माजविणा-या, अट्टल गुन्हेगारावर एम.पी. डी. ए. कायद्यान्वये ८८ वी स्थानबध्दतेची कारवाई..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा

हडपसर पोलीस ठाणे पुणे शहर हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार राकेश शंकर ठोकळ, वय २१ वर्षे, रा. स. नं. ३१५ खजुरे वस्ती दर्ग्याचे मागे, वैदवाडी, हडपसर, पुणे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोयता, तलवार या सारख्या जीवघेण्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, दुखापत, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ०५ वर्षामध्ये त्याचेविरूध्द ०६ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते.

प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन श्री. अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी नमूद इसमाचे विरुध्द एमपीडीए कायद्यान्वये कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह, कोल्हापूर येथे ०१ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत. नमूद इसमास स्थानबध्द करण्यामध्ये श्री. अरविंद गोकुळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस ठाणे व श्रीमती वैशाली चांदगुडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी. सी. बी. गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी कामगिरी पार पाडली.

मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी दहशत निर्माण करणा-या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. आजतागायत ८८ गुन्हेगारांना एमपीडीए कायदयान्वये स्थानबध्द केले आहे. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!