दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त तिन्ही सेवादल प्रमुखांकडून पुष्पचक्र अर्पण..!!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम, एडीसी, नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम, एडीसी, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएम, एडीसी , यांनी दिवंगत जनरल बिपिन रावत, पीव्हीएसएम, युवायएसएम, एव्हीएसएम, वायएसएम, एसएम, एडीसी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, खडकवासला येथील आयकॉनिक हट ऑफ रिमेंबरन्स येथे आदरांजली वाहिली.भारतीय सशस्त्र दलाच्या पहिले सीडीएस यांच्या निधनाची जी वेळ होती, त्याच वेळी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
जनरल बिपिन रावत हे 53 व्या एनडीए अभ्यासक्रमाचे चार्ली स्क्वाड्रनचे माजी विद्यार्थी होते.जनरल ऑफिसर यांचे 8 डिसेंबर 2021 रोजी हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत दुर्दैवी निधन होण्यापूर्वी लष्कराचे 27 वे प्रमुख आणि त्यानंतर पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून त्यांनी देशाची सेवा केली.
जनरल बिपिन रावत हे एक सर्वोत्कृष्ट सैनिक आणि खरे देशभक्त होते, ज्यांनी आपल्या सशस्त्र दलांचे आणि सुरक्षा यंत्रणेचे आधुनिकीकरण करण्यात मोठे योगदान दिले. भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून, जनरल ऑफिसरनी आपल्या सशस्त्र दलांशी संबंधित विविध पैलूंवर विशेषत: संरक्षण सुधारणांवर काम केले, धोरणात्मक बाबींबाबत त्यांचे विचार आणि दृष्टीकोन अनन्यसाधारण होते. सशस्त्र दलांमध्ये संयुक्तपणाची आणि एकात्मतेची चिरस्थायी संस्कृती निर्माण करण्यात त्यांनी दिलेले योगदान राष्ट्र कधीही विसरणार नाही.