दिवसाढवळ्या मोबाईल हिसकावुन चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या वानवडी पोलिसांनी आवळल्या मुसक्या..!!
वर्तमान टाइम्स वृत्तसेवा – मॉऊंन्ट कारमेल स्कुल लुल्लानगर येथे फिर्यादी यांचा मोबाईल जुपीटर मोटार सायकल वरुन आलेल्या दोन अनोळखी इसमांनी जबरदस्तीने हिसकावुन नेला होता त्याबाबत वानवडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्याबाबत वानवडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री. भाऊसाहेब पटारे यांचे सुचनांप्रमाणे तपास चालू असताना व वानवाड़ी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे माहीती काढत असताना, पो. अंम सचिन पवार व उत्रेश्वर धस यांना त्यांचे खास बातमीदारमार्फत मिळालेल्या बातमी वरुन तपास पथकाचे प्रभारी पोउनि अजय भोसले व स्टाफ यांनी सापळा रचुन अत्यंत शिताफीने शरद मंजुनाथ, वय २२ वर्षे, राज्य कर्नाटक, यास ताब्यात घेवुन दाखल गुन्हयात अटक केले असुन त्याचेकडुन खालील वर्णनाचा चोरीचा व इतर माल मिळुन आलेला आहे.
१. एक अंदाजे २०,०००/-रुपये किंमतीचा विवो कंपनीचा फिक्कट निळ्या रंगाचा मोबाईल हॅन्डसेट
२. एक अंदाजे १८,०००/- रुपये किंमतीचा विवो कंपनीचा निळे रंगाचा मोबाईल हॅन्डसेट
३. एक अंदाजे ४०,०००/- रुपये किंमतीची ज्युपीटर मोटार सायकल
अशाप्रकारे एकुण ७८,००० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करून ताब्यात घेतला आहे. आरोपी व त्याचा फरार साथीदार हे कर्नाटक येथील असुन ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. आरोपींची मोबाईल चोरीची आंतराज्यीय टोळी असण्याचीही शक्यता असल्याने त्याअनुशंगानेही तपास चालू आहे.
सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उपआयुक्त परि.-५ पुणे शहर श्री. विक्रांत देशमुख, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर सौ. पौर्णिमा तावरे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री भाऊसाहेब पटारे, पोलीस निरिक्षक गुन्हे श्री. संदिप शिवले व तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक अजय भोसले, पो. अंम विनोद भंडलकर, संतोष नाईक, महेश गाढवे, राहुल गोसावी, निलकंठ राठोड, अमोल गायकवाड, विष्णु सुतार, उत्रेश्वर धस, सचिन पवार व विठ्ठल चोरमले यांनी केली आहे