दोन वाहनचोरांना अटक करुन जप्त केल्या १२ मोटर सायकली व ०१ रिक्षा
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- पुणे शहर पोलीस युनिट 05 कडील स्टाफ हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलींग करीत असताना त्यांना अट्टल वाहनचोर सचिन महादेव कांबळे वय २१ वर्षे व पाठीमागे बसलेल्या त्याचा साथीदार गणेश दत्ता मोरे वय १९ वर्षे हे नंबरप्लेट नसलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटर सायकल चालवित असताना गारवा हॉटेल, फुरसुंगी येथे मिळुन आल्याने त्यांना थांबवुन चौकशी केली तर ते उडवाउडवीचे उत्तरे देवू लागल्याने पोलीसांना संशय आला त्या दोघांना युनिट कार्यालयात आणुन त्याचेकडे कौशल्यपूर्व तपास करुन त्यांचेकडुन कि.रु. ५,२०,०००/- च्या एकुण १२ मोटर सायकली व ०१ रिक्षा जप्त करण्यात आलेली आहे.
तर आरोपी यांचेकडुन खालील प्रमाणे एकूण 13 वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
१. हडपसर पो.स्टे. गु.र.नं. ८२२/२०२० भा.द.वि. कलम ३७९
२. हडपसर पो.स्टे.गु.र.नं. १४९१ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९
३. हडपसर पो.स्टे.गु.र.नं. १४९२/२०२३ भा.द.वि. कलम ३७९
४. हडपसर पो.स्टे.गु.र.नं. १४९४/२०२३ भा.द.वि. कलम ३७९ ५. लोणीकाळभोर पो.स्टे. गु.र.नं. ६१३/२०२३ भा.द.वि. कलम ३७९
६. लोणीकाळभोर पो.स्टे. गु.र.नं.६१४ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९
७. चंदननगर पो.स्टे.गु.र.नं.१९६ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९
८. चंदननगर पो.स्टे. गु.र.नं. ४५४ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९
९. भारती विद्यापिठ पो.स्टे. गु.र.नं. ६२६ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९
१०. बंडगार्डन पो.स्टे. गु.र.नं. ३०९/२०२३ भा.द.वि. कलम ३७९
११. दिघी पो.स्टे. गु.र.नं. १०६ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९
१२. जेजुरी पो.स्टे. गु.र.नं. ५४० / २०२३ भा.द.वि. कलम ३७९
१३. कल्याण तालुका पो.स्टे. गु.र.नं.५८९/२०२२ भा.द.वि. कलम ३७९
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. अमोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त, श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस उप निरीक्षक अविनाश लोहोटे, पोलीस उप निरीक्षक चैताली गपाट, पोलीस अमंलदार अकबर शेख, विनोद शिवले, रमेश साबळे, अमित कांबळे, प्रमोद टिळेकर, दया शेगर, प्रताप गायकवाड, शशिकांत नाळे, स्वाती गावडे, पल्लवी मोरे, आश्रुबा मोराळे, दाऊद सय्यद, राजस शेख, पृथ्वीराज पांडुळे, पांडुरंग कांबळे, शहाजी काळे, चेतन चव्हाण, विलास खंदारे, राहुल होळकर, संजयकुमार दळवी यांनी केलेली आहे.