ताज्या घडामोडी

धीरूभाई अंबानी स्कुल, बीकेसी मुंबई येथे स्कुलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्यास गुजरात राज्यातुन केले जेरबंद..!!

बीकेसी पोलीस स्टेशनच्या पथकाने जि. मोरबी, राज्य गुजरात येथुन केले अटक..!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- दिनांक १०/०१/२३ रोजी फिर्यादी श्रीमती रंजना वैभव राव व्यवसाय नोकरी (धीरूभाई अंबानी स्कुल, बीकेसी मुंबई) यांनी बीकेसी पोलीस ठाणेस येवुन कळविले की, धीरूभाई अंबानी शाळा सायंकाळी १६:०० सुटते. शाळा चालु असते तो पर्यंत शाळेच्या कामाचा संदर्भात जेवढे फोन येतात, ते लॅन्ड लाईन वरती घेतले जातात परंतु शाळा सुटल्यानंतर लॅन्ड लाईन वरती येणारे सर्व फोन हे त्यांचे शाळेतील प्रशासकीय कामकाज पाहणाऱ्या मॅडम श्रीमती चंद्रिका गिरीधर यांचे मोबाईल वरती ट्रान्सफर होतात. त्यानुसार दिनांक १०/०१/२३ रोजी शाळा सुटल्यावर सायंकाळी १६:३० वा शाळेच्या प्रशासकीय कामकाज पाहणाऱ्या मॅडम श्रीमती चंद्रिका गिरीधर यांचे मोबाईल क्रमांकावर अज्ञात व्यक्तीने त्याचा मोबाईल क्र ९९२५४५५१८२ यावरून फोन करून सांगितले की, “ मैनें आपके स्कुल मे टाईम बॉम्ब लगाया है.” असे सांगुन फोन कट केला.

श्रीमती चंद्रिका यांनी फिर्यादी यांना संपर्क करून या बाबत माहिती दिली. काही वेळाने पुन्हा अज्ञान व्यक्तीने फोन केला, तो कॉल शाळेच्या गेटवरील सुरक्षारक्षकाने होल्ड करून फिर्यादी श्रीमती रंजना वैभव यांना ट्रान्सफर केला अज्ञात व्यक्तीने सांगितले की, “ त्याचे नाव झाला विक्रम सिंग असुन तो गुजरात मध्ये राहतो. तसेच सदरचे कृत्य केल्यावर पोलीस त्याला पकडतील, जेलमध्ये टाकतली, सोशल मिडीयात त्याचे नाव होईल,” असे बोलुन फोन कट केला. त्यानंतर फिर्यादी यांनी त्यांचे शाळेतील सुरक्षा विभागाचे सर्व अधिकारी यांना सर्व हकीकत सांगितली व पोलीसांशी संपर्क केल्यावर बीडीडीएस पथका मार्फतीने शाळेचा परिसर तपासणी करून घेतला व त्यानंतर फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून बीकेसी पोलीस ठाणेस गुरक्र १०/२०२३ कलम ५०५ (१) (ब) ५०६ भादवि प्रमाणे नोंद करण्यात आला होता.

गुन्हा दाखल केल्यावर आरोपीचा शोध घेण्यासाठी तात्काळ पोलीस पथक वरिष्ठांचे परवाणगीने गुजरात राज्यात पाठविण्यात आले. परिमंडळ-८ कार्यालयाकडुन पोलीस पथकास तांत्रिक मदत देण्यात आली व तांत्रिक तपास करून आरोपीला जि. मोरबी, राज्य गुजरात येथुन दिनांक ११/०१/२३ रोजी बीकेसी पोलीस ठाणे तपास पथकाने ताब्यात घेतले व सदर गुन्हयात आरोपीस अटक करण्यात आलेली आहे.तर गुन्हयाचा पुढिल तपास चालु आहे.

सदरची कामगिरी श्री. विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, मुंबई, श्री देवेन भारती, विशेष पोलीस आयुक्त, मुंबई, श्री. सत्य नारायण, पोलीस सह आयुक्त (का व सु), मुंबई, श्री परमजितसिंह दहिया, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, बांद्रा, मुंबई, श्री. दिक्षीत गेडाम, पोलीस उप आयुक्त, परि. ०८, श्री कैलास आव्हाड, सपोआ खेरवाडी विभाग, श्री. विश्राम अभ्यंकर, वपोनि बीकेसी पो.ठाणे. पोनि गवळी (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली बीकेसी पोलीस ठाण्याचे सपोनि सुनील माळगावी व पो.ह. क्र. नितीन घोरपडे, पोशिक्र.अनुप गायकवाड, यांनी केली आहे.

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!