नशेसाठी मोबाईल व वाहन चो-या करणारा अटटल चोरटा समर्थ पोलीस स्टेशनच्या जाळयात..!!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- मा. पोलीस आयुक्त साो. पुणे शहर यांचे आदेशाने ३१ डिसेंबर च्या अनुशंगाने समर्थ पोलीस स्टेशन हददीत समर्थ पोस्टेचे सपोनि प्रसाद लोणारे व त्यांचे पथक पेट्रोलींग करीत असतांना पोलीस अंमदार हेमंत पेरणे, कल्याण बोराडे व रहीम शेख यांना गोपनिय खबर मिळाली की, एक मोबाईल चोर, चोरीचे मोबाईल विकणेसाठी आलेला आहे. बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांना कळवून तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे व त्यांचे पथकाने सापळा रचुन आरोपी ऋतिक दत्ता सारगे वय २१ रा. आंबेडकर चौक, येरवडा यास ताब्यात घेतले.
सदरचा आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले, त्याचे ताब्यात मिळालेल्या दोन मोबाईलची चौकशी केली असता आरोपी याने मोबाईल जबरी चोरी करुन हिसकावुन नेल्याचे कबुल केले. तसेच त्याने मोटार सायकल सुध्दा चोरी केल्याचे कबुल केले आहे. आरोपी हा नशेसाठी चोरी करीत असल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाले आहे.
आरोपी ऋतिक दत्ता सारगे याचेकडुन एकुण पाच गुन्हे उघडकीस आले असुन मुदेमालामध्ये दोन मोबाईल फोन व तीन दुचाकी असा एकुण २,९०,००० /- रू किंमतीचा मुदेमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपी कडुन समर्थ पोलीस स्टेशनकडील १) गुरनं २२६ / २२ भादवि कलम ३९२ २) गुरनं १९४ / २२ भादवि ३७९ व ३) गुरनं २२४ / २२ भादवि ३७९ असे तिन गुन्हे उघडकीस आले आहे तसेच विश्रांतवाडी पोस्टे कडील गुरनं ३३१ / २२ भादवि ३९२, ३४ प्रमाणे एक गुन्हा व वानवडी पोस्टे कडील १६ / २२ भादवि ३७९ असा एक गुन्हा असे एकुण पाच गुन्हे उघडकीस आलेले आहे. त्यामध्ये एकुण दोन मोबाईल फोन व तीन मोटार सायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत. पुढील तपास सपोनि प्रसाद लोणारे हे करीत आहे.
सदरची कामगिरी ही मा. राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, मा. संदीप सिंह गिल्ल, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- १ पुणे शहर, मा. श्री. सतिश गोवेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली श्री. रमेश साठे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पो.स्टे, श्री प्रमोद वाघमारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे सुचनेनुसार तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोलीस अंमलदार हेमंत पेरणे, रहिम शेख, कल्याण बोराडे, दत्तात्रय भोसले, गणेश वायकर, प्रमोद जगताप, रोहीदास वाघीरे सुभाष पिंगळे, श्याम सुर्यवंशी यांनी केली आहे.