नागालँड विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे 2 उमेदवार विजयी- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- नागालँड विधानसभा निवडणुकीत टूएनसंद सदर- 2 विधानसभा मतदारसंघात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. इम्तिचोबा हे विजयी झाले आहेत. तसेच नागालँड च्या नोकसेन विधानसभा मतदारसंघात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. वाय. लिमा ओनेन चँग हे विजयी झाले आहेत. नागालँड मध्ये गन्ना किसान ( ऊस शेतकरी) या निवडणूक निशाणीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या उमेदवारांनी निवडणूक 8 ठिकाणी लढली आणि त्यात 2 उमेदवार विजयी झाले. अशी माहिती आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिली.
नागालँड मध्ये निवडून आलेले रिपाइं चे दोन्ही आमदार नागालँड मध्ये भाजप एनडीपीपी च्या युतीला सरकार स्थापने साठी पाठिंबा देतील. नागालँड सरकार मध्ये रिपाइं ला सत्तेचा वाटा मिळण्यासाठी आपण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि पक्ष श्रेष्टी नेत्यांना भेटणार आहे असे ना.रामदास आठवले यांनी आज आझाद मैदान येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आज दि.2 मार्च दुपारी 3 वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले मुंबई प्रदेश तर्फे नागालँड मध्ये आरपीआय चे 2 उमेदवार विजयी झाल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय आझाद मैदान मुंबई येथे विजयी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. रिपाइं चे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांच्या नेतृत्वात रिपाइं च्या मुंबईतील कार्यकर्त्यांनी रिपाइं च्या मध्यवर्ती कार्यालयात फटाके वाजवून नाचून आनंद साजरा केला. या आनंद उत्साहात कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ना.रामदास आठवले सहभागी झाले.त्यांनी ढोल वाजवून रिपाइं च्या नागालँड मधील ऐतिहासिक विजयाचा जल्लोष साजरा केला. यावेळी रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, युवक आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पप्पू कागदे, स्थानिक जिल्हा अध्यक्ष संजय पवार, दयाळ बहादूर,सचिनभाई मोहिते, साधू कटके, प्रकाश जाधव, घनश्याम चिरणकर, अमित तांबे, शिरीष चिखलकर, अली चौधरी आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.