ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निवडणुक खर्चाबाबतचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितली लाच..! आरोपी थेट ACB च्या जाळ्यात..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- तक्रारदार यांचे शेतकरी ग्रामविकास पॅनलच्या एकुण १० उमेदवारांच्या निवडणुक खर्चाबाबतचे प्रमाणपत्र देण्यासाठी श्री. क-हाळे अव्वल कारकुन, निवडणुक निर्णय अधिकारी, तहसिल कार्यालय, देऊळगावराजा यांनी प्रती उमेदवार ५००/- रूपये याप्रमाणे १० उमेदवारांचे एकुण ५०००/- रूपयेची लाचेची मागणी केली तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तक्रारीची पडताळणी करून तहसिल कार्यालय देऊळगावराजा येथे सापळा रचला असता तक्रारदार यांचेकडून ५०००/- रुपये लाच स्विकारतांना आलोसे श्री. क-हाळे यांना पंच क्र. १ यांचे समक्ष रंगेहात पकडण्यात आले. यातील आलोसे श्री. रामेश्वर रूस्तुम क-हाळे, वय ३६ वर्ष, अव्वल कारकुन निवडणुक निर्णय अधिकारी, तहसिल कार्यालय, देऊळगावराजा राहणार. सिनगाव जहांगिर, ह.मु. भगवान बाबा नगर, देऊळगावराजा, यांनी लोकसेवक पदाचा गैरवापर करुन, ” ५०००/- रुपये लाचेची रक्कम तक्रारदार यांचेकडून स्विकारुन लोकसेवक पदाला न शोभणारे गैरवर्तन केल्याने आलोसे यांचे विरुद्ध पोस्टे देऊळगावराजा येथे अप.नं. ०३ / २०२३ कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कार्यवाही मा. श्री. मारूती ना. जगताप, पोलीस अधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती मा. श्री. अरुण सावंत, अप्पर पोलीस अधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती मा. श्री. देविदास घेवारे, अप्पर पोलीस अधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी श्री. संजय चौधरी, पोलीस उपअधिक्षक अॅन्टी करप्शन ब्यरो बुलडाणा व सापळा पथक पोहेकॉ. विलास साखरे, पोहेकॉ. राजेंद्र क्षिरसागर, पोकॉ. अझरूददीन काझी, तसेच चालक नापोकॉ. नितीन शेटे यांनी पार पाडली.

शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत अॅन्टी करप्शन ब्यरो बुलडाणा. कार्यालय दुरध्वनी क्रमांक ०७२६२-२४२५४८ व ८८८८७६८२१८ तसेच टोल फि कमांक १०६४ यावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उपअधिक्षक अॅन्टी करप्शन ब्यरो बुलडाणा यांनी केले आहे

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!