ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

परदेशी बनावटीचे “ई-सिगारेटचा”अवैध साठा गुन्हे शाखा कडून जप्त..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- कक्ष- १० गुन्हे प्रकटीकरण शाखा, मुंबई येथील सपोनि श्री. धनराज चौधरी यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराने विश्वसनिय खबर दिली की, समराज गल्ली, विलेपार्ले पश्चिम, मुंबई येथे भारत सरकारने प्रतिबंधीत केलेली परदेशी बनावटीचे ” ई-सिगारेट ” अवैध रित्या जवळ बाळगलेला साठा बेकायदेशिरपणे वितरणासाठी वर दोन इसम येणार आहेत. त्यावरून प्रपोनि दिपक सावंत यांनी वरिष्ठांना अवगत करून पथक तयार केले व नियोजनबध्द रित्या मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी सापळा लावला. सदर ठिकाणी दोन इसम आले असता बातमीदार यांनी त्यांचेकडे इशारा करून हे तेच व्यक्ती असल्याचे सांगितल्याने त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले व त्यांचेजवळ असलेल्या रेग्जिन बॅगची पंचासमक्ष तपासणी केली असता त्यांचेकडे PODSALT NEXUS 3500 Puffs E- Cigarrette वेगवेगळे फ्लेवर, १० वेगवेगळे बॉक्स ऐका बॉक्स मध्ये १० सिगरेट असलेले एकुण १०० ई सिगरेट किं.अं.रू.१,००,०००/- प्रमाणे ई-सिगारेट मिळून आल्या.

दोन्ही आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्या जवळील मुद्देमाल जप्त करून त्यांच्या विरुध्द जुहू पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करून त्यांना जुहु पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री. लखमी गौतम, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, मा. पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण- १) गुन्हे शाखा, श्री. कृष्ण कान्त उपाध्याय, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (डि-पश्चिम) श्री. दिपक निकम, यांचे मार्गदर्शनाखाली, व कक्ष -१० चे प्रभारी पोलीस निरीक्षक, श्री. दिपक सावंत यांच्या पर्यवेक्षणाखाली कक्ष – १०, गुप्रशा, मरोळ मुंबई येथील सपोनि. श्री. धनराज चौधरी, आणि पोलीस अंमलदार पोहक.धारगळकर, पोहक्र. धनवडे, पोहक्र.मोरे, पोहक.चिकणे, पोशिचा.चव्हाण यांनी पार पाडली.

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!