परभणी रेल्वे स्टेशन वरील तिकीट काउंटर कर्मचाऱ्यांची अरेरावीची भाषा..!!
वेळेवर तिकीट न दिल्यामुळे प्रवाशांची रेल्वे गेली निघून..!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- परभणी रेल्वे स्टेशन रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी सामाजिक युवा कार्यकर्ता प्रदिप नन्नवरे हे रेल्वे स्टेशनवर तिकीट काउंटर नंबर चार या ठिकाणी पूर्णा ला जाण्यासाठी रेल्वेचे तिकीट घेण्यासाठी काउंटर वर उभे होते.
त्या रांगेमध्ये सहा प्रवासी तिकीट घेण्यासाठी होते त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक होते. सचखंड एक्सप्रेस प्लॅटफॉर्म वर उभी होती. काउंटर वरचे सर्व प्रवासी संबंधित तिकीट काउंटर कर्मचाऱ्यांना विनंती करत होते आम्हाला लवकर तिकीट द्या नाहीतर आमची गाडी जाईल.
त्यावेळी त्या कर्मचाऱ्यांनी अरेरावीची भाषा वापरून तिकीट तर दिलेच नाही. उर्मट पणाची भाषा वापरली. गाडी रेल्वे स्टेशनवर पाच मिनिटे उभे होती. या दरम्यान रेल्वे निघून गेली. नंतर त्या कर्मचाऱ्यांनी तिकीट दिले.
यामुळे सर्व प्रवाशांची कमालीचे मानसिक व आर्थिक हानी झाली . परभणी रेल्वे स्टेशनवर अशा प्रकारचा प्रकार नेहमीच होत असतो. असे त्या ठिकाणी असलेल्या नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सांगितले.
अशा बेजबाबदार कर्तव्यात कसूर करणाऱ्या सौजन्यशीलतेचा अभाव असणाऱ्या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कार्यवाही करावी अशा प्रकारचे निवेदन सामाजिक युवा कार्यकर्ता प्रदिप नन्नवरे यांनी केले आहे. तशा प्रकारचे अर्ज रेल्वे विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडे दिले आहे.