पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया मध्ये परिमंडळ -३ साठी शासनाची मिळाली मंजुरी
पोलीस उपायुक्त परिमंडळ - ३ श्री. संदीप डोईफोडे यांची नियुक्ती तर वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त म्हणून श्री. शिवाजी पंडीतराव पवार हे नियुक्त
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- सन २०१८ मध्ये पिंपरी चिंचवड आयुक्तालयाची निर्मीती करताना शासनाने पिंपरी चिंचवड आयुक्तालयाकरीता २ परिमंडळे व ४ विभागांना मान्यता दिली होती. परंतू त्यानंतर वाढती लोकसंख्या, नागरिकरण, औद्योगिकीकरण, शैक्षणीक संस्था, वाहतूक / वाहनांची वाढती संख्या तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणेचे दृष्टीकोनातून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची विभागवार पुर्न: रचना होणे गरजेचे होते.
ही गरज लक्षात घेवून पोलीस आयुक्त, श्री. विनय कुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचा कार्यभार हाती घेताच कायदा व सुव्यवस्था हाताळणी तसेच नागरिकांना सोईचे होईल या दृष्टीकोनातून आणखी १ परिमंडळ व २ अतिरिक्त विभाग वाढवून पोलीस आयुक्तालयाची पुर्न: रचना होणे आवश्यक होते. त्याचप्रमाणे वाहतूकीचे व्यवस्थापन, नियोजन करण्याचे दृष्टीकोनातून पोलीस उप आयुक्त दर्जाचे अधिकारी यांचे नियुक्ती होणे देखील आवश्यक होते.
यासाठी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाकडून दि. १७.५.२०२३ रोजी शासनास प्रस्ताव पाठविणेत आला होता. त्यानुसार गृहविभागाने दि. ४.९.२०२३ रोजी पोलीस आयुक्तालया करीता आणखी १ परिमंडळ व ४ अतिरिक्त विभागांना मान्यता दिलेली आहे. त्याअनुषंगाने यापुर्वीच इकडील आयुक्तालयामध्ये पोलीस उपआयुक्त दर्जाचे २ अधिकारी हजर झालेले आहेत.
गृहविभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील प्राप्त अधिसुचनानुसार परिमंडळीय उपायुक्त तसेच विभागीय सहा पोलीस आयुक्त यांचे कायक्षेत्राची पुर्न: रचना निश्चीत करण्यात आलेली आहे.
नवनिर्मीत पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३ करीता कार्यालय भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन इमारतीमध्ये कार्यान्वीत करण्यात आले असुन पिंपरी चिंचवड येथे यापुर्वी नव्याने हजर झालेले श्री. संदीप डोईफोडे यांची पोलीस उपायुक्त परिमंडळ – ३ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
त्याचप्रमाणे वाहतूकीचे व्यवस्थापन व नियोजन याकरीता यापुर्वी नव्याने हजर झालेले श्री. शिवाजी पंडीतराव पवार यांची वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.