पुणे जिल्हा परिषदेच्या शाळा व वाड्या वस्त्यांमधील हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप
कुसुमवत्सल्य फाउंडेशन व प्रकाशवाट सामाजिक बांधिलकी ट्रस्ट, पुणे तर्फे अनोखा उपक्रम
पुणे, निर्भीड वर्तमान:- पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना कुसुमवत्सल्य फाउंडेशनच्या वतिने मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.
अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे पुरेसे शैक्षणिक साहित्य विकत घेता येत नाही, परिणामी त्यांची शैक्षणिक प्रगती वाढीस लागत नाही. कुसुमवत्सल्य फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली पाटील यांच्या दूरदृष्टी व संकल्पनेतून पुण्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या जिल्हापरीक्षेच्या शाळांमध्ये व वस्ती वाड्यांमधील कोळवडी, निवी, गेव्हांडे, कोदापुर, चांदवणे, बोपे, कुंबळे, वेल्हा, भोर या गावातील शाळांचा व वस्त्यांचा समावेश आहे.
यावेळी विशेष उपस्थिती म्हणून कुसुमवत्सल्य फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली पाटील होत्या तसेच प्रकाशवाट सामाजिक बांधिलकी ट्रस्ट पुणे चे अध्यक्ष, इंद्रजीत डोंगरे, कार्याध्यक्ष विजय जगदाळे, सचिव प्रमोद गरुड, कोषाध्यक्ष अनंता दळवी, छाया सपकाळ, सरपंच सागर चोरगे, विकास कडू पाटील, विलास राठोड, वृषाली सूर्यवंशी, राहुल कडू पाटील, स्वप्नील शिंदे, विद्या कोतवाल, भूषण पाटील, राजू सांगळे, बालाजी सातपुते, बाळासाहेब पोकळे आदि पदाधिकारी उपस्थित होते.