ताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रसामाजिक
पुण्यातील जाधवर कॉलेज नऱ्हे येथे रामदास कदम यांच्या कार्यक्रमात मराठा क्रांती मोर्चाचा निषेध
मराठासेवक उमेश शिंदे, तानाजी चिकणे सह अनेकांना पोलीसांनी घेतले ताब्यात
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- नऱ्हे गावात जाधवर कॉलेज येथे नेते रामदास कदम आलेले असताना गनिमी काव्याने कार्यक्रमात घुसून भर कार्यक्रमात मराठासेवक उमेश शिंदे आणि तानाजी चिकणे यांनी विरोध केला आहे.
तर कार्यक्रम स्थळाच्या बाहेर शेकडो कार्यकर्त्यांनी राजकीय नेते मंडळींचा घोषण देत काळे झेंडे दाखवून निषेध केला आहे.
आज एकनाथ खडसे, रामदास कदम हे जाधवर कॉलेज येथील कार्यक्रमात आले असताना मराठा क्रांती मोर्चा तर्फे त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले.
पोलीसांनी घटनास्थळावर तात्काळ पाचारण करुन चंदन कड, रमेश दौंडकर, बाळासाहेब चव्हाण, सुभाषभाऊ ढमाले, अभिजीत कदम, आकाश देशमुख, सुमित कदम, राजेंद्र लिपाणे, विलास बरसले यांना अटक करून नऱ्हे चौकी येथे घेवुन गेले आहेत.