पुना कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे गुन्हे शाखे मार्फत केले समुपदेशन…!!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- युवा विचार परिवर्तन या उपक्रमाची सुरवात पुना कॉलेजपासुन करण्यात आली असुन हा उपक्रम मा. रितेश कुमार साो, पोलीस आयुक्त, पुणे शहर व मा. संदीप कर्णिक सह पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या Social Outreach संकल्पनेतुन राबविण्यात आलेला आहे.
पुना कॉलेजमध्ये या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यावेळी कार्यक्रमाला पुना कॉलेजचे प्रिन्सिपल डॉ. अन्वर शेख, डॉ. गुलाब पठाण आणि गुन्हे शाखा युनिट ६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाला इयत्ता ११ वी, १२ वी व एफ वाय या वर्गामध्ये शिकत असलेले ८० ते १०० विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना श्री. रजनीश निर्मल वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या अंमली पदार्थ सेवनाबाबत मार्गदर्शन करुन व त्याच्यातुन निर्माण होणारे वैयक्तिक, कौटुंबिक व सामजिक दुष्परिणाम बाबत माहिती देण्यात आली. तसेच मुलींना दैनिक प्रवास करतांना, सहली साठी जातांना व रात्री उशिरा प्रवास करतांना काय काळजी घ्यावी व स्वतःच्या सुरक्षिततेबाबत काय पावले उचलावीत याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच तिथे उपस्थित विद्यार्थांना सोशल मिडियाचा सदुपयोग याबाबत माहिती देण्यात आली व सध्या तरुणांमध्ये सोशल मिडियाचा गैरवापर कशाप्रकारे केला जातो तसेच त्याचे काय दुष्परिणाम होतात याबाबत समुपदेशन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षाबाबत माहितीही देण्यात आली व विद्यार्थ्यांना सामजिक सलोखा व एकोपा राखण्याबाबत समुपदेशन करण्यात आले आहे.
युवा विचार परिवर्तन हा एक नवा उपक्रम आर. के. बहुउद्देशीय संस्थेच्या सहकार्यातुन चालु करण्यात आलेला असुन हा उपक्रम पुण्यातील इतर महाविदयालयामध्ये गुन्हे शाखा, पुणे शहर यांचे मार्फतीने राबविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुना कॉलेजचे प्रिन्सिपल डॉ. अन्वर शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन हे गुलाब पटेल यांनी केले. तसेच या कार्यक्रमाला आर. के. बहुउद्देशीय संस्थेच्या सचिव सौ. भाग्यश्री साळुंके आणि पुना कॉलेजचे सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.