पोलीस नेमबाजी स्पर्धा – २०२२, यात पुणे शहर पोलीस दलास एकुण ०७ सुवर्ण, ०१ रजत व ०३ कांस्य पदक प्राप्त..!!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा
दि. २९/११/२०२२ ते ०२/१२/२०२ रोजी पर्यंत महाराष्ट्र पोलीस नेमबाजी स्पर्धा – २०२२ ह्या राज्य राखीव पोलीस बल गट क्र ०१ पुणे येथील वडाची वाडी शुटींग रेंज येथे पार पडल्या. स्पर्धांमध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील एकुण १८ घटकांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेमध्ये रायफल स्पर्धेच्या एकुण ०५ प्रकार, पिस्टल फायर प्रकारच्या एकुण ०४ प्रकार व एम पी ५ या फायर स्पर्धेत एकुण ०४ प्रकारच्या स्पर्धा आयोजीत करणेत आलेल्या होत्या. या स्पर्धेत पुणे शहर पोलीस दलातील पोलीस अंमलदार राजेंद्र पाटील यांनी एकुण ०५ सुवर्ण पदक,०१ कांस्य पदक तसेच बेस्ट एम पी ५ शुटर आणि बेस्ट पिस्टल शुटर ट्रॉफी, पोलीस अंमलदार महेश जाधव यांनी रायफल ३०० गज प्रोन पोझीशन फायर प्रकारात ०१ सुवर्ण पदक, एम पी ५ फायर प्रकारात ०१ रजत पदक ०१ कांस्य पदक, पोलीस अंमलदार अमोल नेवसे यांनी रायफल ३०० मिटर थ्री पोझिशन या फायर प्रकारात ०१ सुवर्ण पदक, सहा पोलीस फौजदार नितीन शिंदे यांनी रायफल ३०० गज प्रोन प्रकारात ०१ कांस्य पदक प्राप्त केले. .
पुणे शहर पोलीस दलास एकुण ०७ सुवर्ण ०१ रजत व ०३ कांस्य पदक प्राप्त झाले आहेत. वरील सर्व स्पर्धकांची निवड माहे जानेवारीमध्ये तामीलनाडु येथे होणा-या आयोजीत अखील भारतीय पोलीस नेमबाजी स्पर्धेत सहभागी होणा-या महाराष्ट्र पोलीस नेमबाजी संघात झालेली आहे. या उत्कृष्ठ कामगिरी करीता मा. पोलीस आयुक्त पुणे शहर मा सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. अपर पोलीस आयुक्त, प्रशासन पुणे शहर व मा. पोलीस उप-आयुक्त मुख्यालय पुणे शहर यांनी पदक विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले व पुढील आयोजीत अखिल भारतीय पोलीस नेमबाजी स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.