पोलीस व रिपोर्टर असल्याची सांगून फसवणुक करणा-या टोळीतील आरोपींना सहकारनगर पोलीसांनी केले अटक
वर्तमान टाइम्स। वृत्तसेवा :- दि.१८/०२/२०२३ रोजी बालाजीनगर येथील एका महिलेच्या घरात जावुन येथे वेश्या व्यवसाय चालतो असे खोटे सांगुन आम्ही अॅन्टिकरप्शनचे पोलीस व रिपोर्टर आहे अशी बतावणी करुन केस न करण्यासाठी तेथील महिलेकडुन ७०,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व १४,०००/- रुपये रोख रक्कम असा ८४,०००/- हजार रुपयाचा माल फसवणुक करून घेवुन गेले होते या घडलेल्या प्रकार बाबत महिला व सोबत असलेल्या व्यक्ति यांचेविरुध्द फिर्यादी महिला यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दाखल गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहकारनगर पोलीस स्टेशन, पुणे श्री. सावळाराम साळगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, समीर शेंडे व तपास पथकाचे स्टाफ पाहीजे आरोपींचा बातमीचे आधारे शोध घेत असताना पोलीस अंमलदार, बापु खुटवड, बजरंग पवार यांना बातमी मिळाली की, दाखल गुन्हयातील महिला आरोपी १) सिमा शशिकांत शिंदे, वय ३० वर्षे, ही के. के. मार्केटच्या पुढे असलेल्या नर्सरी जवळील शिवपार्वती सोसायटी समोर उभी आहे.
मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावुन महिला पोलीस अंमलदार, रामगुडे यानी महिलेस ताब्यात घेवुन तीचेकडे तपास करुन आरोपी रमेश सिताराम कंक, वय-३५ वर्षे, स्वप्नील संतोष काळे, वय- १९ वर्षे, कार्तीक संतोष कांबळे, वय २१ वर्ष, एक विधीसंघर्ष बालक यांना न-हे येथुन ताब्यात घेवुन, त्यांचेकडे अधिक तपास करता, त्यांनी हा गुन्हा तोतया रिपोर्टर व तीचे सोबतचे महिलांसह पोलीस असल्याची बतावणी करुन केल्याची माहिती दिली.
आरोपींचे ताब्यातुन गुन्हयात फसवणुक करुन नेलेल्या दागीन्यांपैकी ३५,०००/- रुपये किचे दागीने, ५,५००/- रुपये रोख रक्कम व गुन्हयात वापरलेले मोबाईल असा एकुण ९७,५००/- रुपये किचा ऐवज जप्त केला असुन, चार आरोपी यांना दाखल गुन्हयात अटक करून, एक विधीसंघर्षीत बालक यास ताब्यात घेण्यात आले आहे. पाहिजे आरोपी तोतया रिपोर्टर व तीचे सोबतचे ०५ महिलांचा शोध सुरु आहे.
सदरची कामगीरी मा.अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग श्री. राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ – २, श्रीमती. स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे, श्रीमती सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सावळाराम साळगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक,समीर शेंडे, पोलीस अंमलदार, बापु खुटवड, भुजंग इंगळे, सुशांत फरांदे, बजरंग पवार, महेश मंडलिक, नवनाथ शिंदे, सागर सुतकर, सागर कुंभार, विशाल वाघ, शिंदे, म. पोलीस अंमलदार, रामगुडे यांनी केली आहे.