प्रसिद्ध संगीतकार ए.आर.रहमान.यांचा लाईव्ह शो वेळेत बंद, तर पब्स व बार पहाटे तीन ते साडेतीन वाजेपर्यंत कोणाच्या आशिर्वादाने सुरू..?
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- मागिल आठवड्यामध्ये 30 एप्रिल रोजी सुप्रसिद्ध, ऑक्सर विजेते, संगीतकार ए. आर. रहमान यांचा लाईव्ह शो पुण्यातील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी यांनी मा. सुप्रीम कोर्ट यांच्या दिलेल्या आदेशाचे पालन करत वेळेनुसार बंद केला होता भारताचे संविधानीक नियमाचे पालन करने हे प्रत्येक भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे व नियम हा सर्वांना सारखा असतो याचे हे ज्वलंत उदाहरणच होते.
पण, पुढे नियम आपल्या हितसंबंधा नुसार बदलतात का? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांना पडावा असेच एक उदाहरण म्हणजे राजा बहादुर मिल्स पुणे स्टेशनच्या मागच्या बाजूला आहे या ठिकाणी पूर्वी कापडाची गिरणी होती परंतु आत्ता या घडीला याच ठिकाणी सर्व कापड गिरणी चे सर्व व्यवसाय बंद करून मोठ्या प्रमाणात हॉटेल व बार चा व्यवसाय चालू आहेत या सर्व पब्स,बार, रेस्टॉरंट मध्ये मोठ्या आवाजात स्पीकर लावून पहाटे तीन ते साडेतीन वाजेपर्यंत दारू विक्री व्यवसाय केला जातो.
राजा बहादूर मिलच्या एका बाजूला गोरगरीब मागासवर्गीयांशी कष्टकऱ्यांची वस्ती असून दुसऱ्या बाजूला नायडू हॉस्पिटल व कैलास स्मशानभूमी आहे नायडू हॉस्पिटल मध्ये देखील शहरातील गरीब वस्तीतील पेशंट उपचार घेत असतात याच ठिकाणी रात्रभर होणाऱ्या त्रासामुळे वस्तीतील लोकांना तसेच हॉस्पिटल मधील पेशंटला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो.
नायडू हॉस्पिटल हा परिसर सरकारने शांतता क्षेत्र घोषित करण्यात आलेला आहे असे असताना देखील राजा बहादुर मिल मधील सर्व हॉटेलमध्ये रात्रभर मोठ्या मोठ्याने स्पीकर चालू असतात व सरकारने दिलेल्या वेळेनंतरही दारू विक्री केली जाते हा प्रायव्हेट रोड व वस्ती राजा बहादुर मिल च्या सीमा भिंतीच्या लगतच आहे या ठिकाणी गोर गरीब मागासवर्गीय वर्ग व विद्यार्थ्यांचा वर्ग मोठ्या प्रमाणात राहत असून त्यांना देखील या आवाजाचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असतो. लोकांची झोपमोड होणे विद्यार्थी वर्गाचा अभ्यास होत नाही या उलट या ध्वनी प्रदूषणामुळे या भागात राहणारे लोकांचे तसेच नायडू हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांचे मानसिक संतुलन पूर्णतः बिघडत असून याचा त्यांच्या जीवनावर वाईट परिणाम होत आहे. राजा बहादुर मिल कंपाऊंड परिसर हे इनामी वर्ग ड च्या खाली येते असल्याने महसूल विभागाने या ठिकाणी जैसे थे स्थिती ( stay order) असून देखील मोठ्या प्रमाणात बांधकाम येथे चालू आहे या सगळ्या गोष्टींना पोलीस खात्याच्या तसेच राज्य उत्पादन विभागाच्या व बांधकाम विभागातील काही भ्रष्ठ अधिकाऱ्यांचा छुपा पाठिंबा आहे असे दिसून येत आहे. या पाठिंबाचे कारण जर पोलीस खात्यातील वरिष्ठांनी या प्रकरणीची सखोल चौकशी केल्यास लक्षात येईल याचे हेच एक उदाहरण पुरेसे आहे म्हणजे न्यायालयाच्या अटी शर्तीचे पालन करत आत्ताच त्या ठिकाणी झालेल्या जागतिक ओळख असलेले, प्रसिद्ध संगीतकार, ए. आर. रहमान यांचा लाईव्ह शो वेळेत कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांनी बंद केला होता परंतु याच ठिकाणी जे पब्स आहेत ते पहाटे तीन ते साडेतीन वाजेपर्यंत चालू असतात हि एक अतिशययोक्ती आहे की स्थानिक नागरिकांनी पोलीस यंत्रणेला सतत मदत मागून देखील कुठल्याही प्रकारची मदत केली जात नाही व स्पीकर पूर्ण आवाजात पहाटे साडेतीन ते चार वाजेपर्यंत दररोज चालू असतात पुणे शहर पोलीस दलाचे सामाजिक सुरक्षा विभाग गोपणीय माहिती नुसार काही हाॅटेल वरती कारवाई करते परंतू न्यायालयाने दिलेल्या नियमाचे पालन होत आहे असे पुणेकरांना दिसते अशी भावना नाही.
पुणे शहरामध्ये विशेषः बंडगार्डन पोलीस स्टेशन अंतर्गत येणारा भाग राजा बहादूर मिल्स येथे नागरिकांकडून दिलेल्या तक्रारीवरून पोलीस येतात तक्रारीच्या ठिकाणी आत जातात व बाहेर येतात परंतु ते गेले की स्पीकर चा आवाज पुन्हा सुरूच राहतो या परिसरात नेमकं कोणत्या नियमानुसार पहाटे तीन ते साडेतीन वाजेपर्यंत स्पीकर्स चालू असतात व आपले अधिकारी कोणती विशिष्ट परवानगी देतात व कुठल्या कायद्यांतर्गत पहाटे तीन साडेतीन व चार वाजेपर्यंत या ठिकाणी दारू विक्री केली जाते व स्पीकर्स चालू असतात असा सवाल रिपब्लिकन संघर्ष सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. मंगेशभाऊ सोणावने यांनी निवेदना मार्फत पोलीस प्रशासन यांना विचारला आहे. सदर ठिकाणी चालू असलेल्या सर्व व्यवहार हे कायद्याने घालून दिलेल्या वेळेच्या मर्यादितच चालू राहतील व स्पीकर चा आवाज आजूबाजूला नागरिकांना व हॉस्पिटल मधील रुग्णांना त्रास होणार नाही याची काळजी बार मालकांनी व प्रशासनाने घेण्यात यावी असे निवेदन रिपब्लिकन संघर्ष सेनेचे मा. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. मंगेशभाऊ सोणावने यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त साहेब यांच्या कडे केली आहे.