फायरींग व धारदार शस्त्राने वार करुन निघृण हत्या करणारी टोळी १२ तासात जेरबंद..!!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा
पुणे, प्रतिनिधी
पिंपरी पोलीस स्टेशन हद्दीत परशुराम चौक, रामनगर, चिंचवड येथे जुन्या भाडंणाच्या कारणावरुन तसेच व्यावसायीक वादातून कट रचुन गावठी कट्टा व धारदार शस्त्राने विशाल गायकवाड या तरुणावर हल्ला करुन निघृण खून केला बाबत पिंपरी पोलीस स्टेशन येथे अर्जुन नागु गायकवाड यांनी फिर्याद दिली होती त्याअनुषंगाने पिंपरी पोलीस ठाणे गुन्हा रजि.क्रं. १०५८ / २०२२, भादंवि कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९ आर्म अॅक्ट कलम क्र. ३, ४,२५,२७ प्रमाणे व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१), १३५ व क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ३, व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयामध्ये आरोपीबाबत काहीएक माहिती उपलब्ध नसताना मा. पोलीस आयुक्त सो यांचे मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड येथील २०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज चेक करुन तांत्रिक विश्लेषनाव्दारे ०७ पुरूष ०१ महिला आरोपींना १२ तासांच्या आत अटक करण्यात आली असुन ०२ अल्पवयीन बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. उर्वरीत आरोपींना ताब्यात घेवून तांत्रिक विश्लेषनाव्दारे गुन्हयातील अपराध सिध्दी करण्याच्या अनुषंगाने सखोल तपास चालू आहे.