बंडगार्डन पोलिसांनी 01 पिस्टल, 02 जिवंत राऊंड जप्त करुन आरोपीस केले जेरबंद
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तपास पथकातील अधिकारी, कर्मचारी हे पेट्रोलिंग करत असताना पो. शि. ज्ञाना बडे व मनोज भोकरे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडुन माहिती मिळाली कि एक व्यक्ती हा पिस्टल घेवुन साधू वासवानी चौक या ठिकाणी येणार आहे. मिळालेली बातमी आपल्या वरिष्ठ अधिकारी यांना सांगुन आदेशानुसार पोलीसांनी तात्काळ माहितीच्या ठिकाणी सापळा रचून चेतन लक्ष्मण चव्हाण वय -22 यास शिताफीने ताब्यात घेतले त्याची अंगझडती घेतली असता 1 पिस्टल व 02 जिवंत राऊंड मिळून आल्याने बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गु .र .न – 322/2023 भारतीय हत्यार कायदा 3(25) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
हा गुन्हेगार पकडण्यासाठी माहिती मिळविणारे पो.शि.ज्ञानेश्वर दादा बडे यांनी या पुर्वीही आपल्या बातमीदारा मार्फतीने आंतरराज्य गुन्हेगार टोळीला नंदुरबार येथुन 24 तासाच्या आत जेरबंद करुन चोरीस गेलेले रोख रुपये १,९०,०००/- व १५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले होते तत्कालीन पोलीस आयुक्त यांनी उल्लेखनिय कामगिरीबद्दल विशेष प्रशस्तीपत्र देऊन श्री. बडे यांचा गौरव ही करण्यात आला होता.बडे यांच्या शहरात पसरलेले बातमीदारांचे जाळे गुन्हेगारांवर चाप बसण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे हे विशेष म्हणावे लागेल.
सदरची कारवाई अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग पुणे शहर प्रवीणकुमार पाटील साहेब, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 स्मार्तना पाटील मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर विभाग संजय सुर्वे सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडगार्डन संतोष पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रशांत भस्मे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे, पो. हवा सुधीर घोटकुले, अनिल कुसाळकर, पो.शि ज्ञाना बडे, संजय वणवे, शिवाजी सरक, मनोज भोकरे यांचे पथकाने केली आहे.